खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये एकाचवेळी घरात मिळाले ५ जणांचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 01:19 PM2020-04-25T13:19:27+5:302020-04-25T13:22:03+5:30
शनिवारी सकाळी एटा येथे राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे घरात मृतदेह आढळले आहेत.
आग्रा - लॉकडाऊनमध्ये एकाचवेळी घरात पाच जणांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी एटा येथे राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे घरात मृतदेह आढळले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. सर्वांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मृतांमध्ये मुलेही आहेत. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे, हत्या किंवा सामूहिक आत्महत्येचे प्रकरण आहे का हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेने खळबळ उडाली आहे.
Coronavirus Lockdown : नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्यांनी पोलिसांवर केली दगडफेक
लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू
नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास एटाच्या मोहल्ला श्रृंगार नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. रात्री उशिरापर्यंत शेजार्यांना कोणी घराबाहेर पडताना दिसले नाही तेव्हा त्यांना संशयास्पद वाटले. कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस दरवाजा तोडून आत शिरले. राजेश्वर प्रसाद पचौरी (75), जावई दिव्या (35), नातू आयुष (८) आणि लालू (१) आणि दिव्याची बहीण बुलबुल (२०) यांचे मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. वयस्कर राजेश्वर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर दिव्याच्या हाताची नस कापलेली होती. जागेवर ब्लेडचा तुकडा आणि सल्फासच्या गोळ्याही सापडल्या आहेत. घर बंद होते आणि पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. रात्री कोणत्या वेळी ही घटना घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजेश्वरचा मुलगा दिलीप रुड़की येथे काम करतो, तो घरी नव्हता. घरात फक्त मुले व स्त्रिया होती. माहिती मिळताच एसएसपी सुनील कुमार सिंह आणि इतर अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.
डोक्याला इजा झाल्याने खुनाचा संशय
हत्येला आत्महत्या केल्याचे रंग तर देण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे, परंतु वयस्कर महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे या हत्या असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की, जर ही घटना आत्महत्येची असेल तर डोक्याला इजा कशी होईल. वयोवृद्धाच्या दुखापतीमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे, त्यामुळे पोलिसांना याक्षणी कोणतेही ठोस निकाल लावता आला नाही. मात्र, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी बोटांचे ठसे व चाचणीचे नमुने घेतले आहेत. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.