वास्को - बंगळूरहुन गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर येथून दुबईला जाणार असलेल्या ‘एअर इंडिया’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाने बेकायदेशीररित्या नेत असलेली १९ लाख रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली. बंगळूरहुन गोव्यात आलेल्या एअर इंडिया ‘एआय ९९३’ च्या विमानात एक प्रवाशी बेकायदेशीररित्या विदेशी चलने घेऊन दुबईला जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाला मिळताच हे विमानत दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानात तपासणी करून त्या प्रवाशाकडून विदेशी चलने हस्तगत केली.दाबोळी विमानतळावरील गोवा कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या (१ जानेवारी) पहिल्याच दिवशी सदर कारवाई करण्यात आली. बंगळूरहुन गोव्याला आलेल्या विमानात एक प्रवाशी विदेशी चलने घेऊन असल्याची माहिती मिळताच गोवा कस्टम विभागाचे उपकमिश्नर डॉ. राघवेंद्र पी व इतर अधिकाऱ्यांनी विमानात जाऊन तपासणी करण्यास सुरवात केली. ह्या तपासणीच्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना एका पुरूष प्रवाशावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आला. यावेळी त्याची कसून तपासणी केली असता त्यांने अंतर वस्त्राच्या आत विविध विदेशी चलने लपवल्याचे उघढ झाले. कस्टम अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात पुढे तपासणी केली असता हा प्रवाशी सदर विदेशी चलने बेकायदेशीररित्या दुबईला नेत असल्याचे उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या ह्या विदेशी चलनात युरो, दीरामंस व इतर विदेशी चलनांचा समावेश असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन भारतीय बाजारात यांची एकूण रक्कम १९ लाख रुपये असल्याचे सांगितले.बंगळूर येथे चढलेला हा प्रवाशी बेकायदेशीररित्या कशासाठी विदेशी चलने नेत होता याबाबत कस्टम अधिकारी सध्या तपास करीत आहेत. गोवा कस्टम विभागाचे कमिश्नर आर.मनोहर व अतिरिक्त कमिश्नर टी.आर.गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.एप्रिल २०१८ ते आतापर्यंत कस्टम विभागाने केली ५५ लाख रुपयांची विदेशी चलने जप्तआर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून अर्थात एप्रिल २०१८ ते आतापर्यंत कस्टम विभागाने केलेल्या विविध कारवाईत एकूण ५५ लाख रुपयांची विदेशी चलने जप्त केली असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदेशीररित्या दाबोळी विमानतळावरून चलने नेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मागच्या काळात कस्टम अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ह्या कारवाया करून ह्या आर्थिक वर्षात अजूनपर्यंत ५५ लाख रुपयांची विदेशी चलने जप्त केली आहेत.
दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून विदेशी चलने जप्त; कस्टम विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 6:09 PM
एअर इंडिया ‘एआय ९९३’ च्या विमानात एक प्रवाशी बेकायदेशीररित्या विदेशी चलने घेऊन दुबईला जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गोवा कस्टम विभागाला मिळताच हे विमानत दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानात तपासणी करून त्या प्रवाशाकडून विदेशी चलने हस्तगत केली.
ठळक मुद्देकस्टम विभागाने बेकायदेशीररित्या नेत असलेली १९ लाख रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केलीह्या विदेशी चलनात युरो, दीरामंस व इतर विदेशी चलनांचा समावेश