दिल्ली दंगल : उमर खालिदला अटक, अकरा तासांच्या चौकशीनंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:28 AM2020-09-14T02:28:32+5:302020-09-14T07:02:54+5:30

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणात अटक केली आहे.

Former JNU student Umar Khalid arrested in connection with North-East Delhi riots | दिल्ली दंगल : उमर खालिदला अटक, अकरा तासांच्या चौकशीनंतर कारवाई

दिल्ली दंगल : उमर खालिदला अटक, अकरा तासांच्या चौकशीनंतर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देउमर खालिदच्या अटकेनंतर 'युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप'ने एक निवेदन जारी केले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली दंगल प्रकरणात आणखी एकाला अटक केली आहे. आता स्पेशल सेलने कारवाई करत उमर खालिदला अटक केली आहे. उमर खालिदला बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणात अटक केली आहे. उमर खालिदला युएपीएअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी उमर खालिदला चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, उमर खालिदच्या अटकेनंतर 'युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप'ने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये '११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सुत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलीस दंगलीच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलने वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे 'युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप'ने म्हटले आहे. 

याशिवाय, सीएए आणि एनआरसीविरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणे हे आमचे प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असेही 'युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप'ने म्हटले आहे.

याआधाही चौकशी केली होती
स्पेशल सेलद्वारे दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा तपास करत आहे. स्पेशल सेलने याआधाही उमर खालिदची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दंगलीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी केलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिद याची चौकशी गेली होती.
 

Web Title: Former JNU student Umar Khalid arrested in connection with North-East Delhi riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.