किवळेत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चौघांना अटक; १२ मुलींची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 08:14 PM2018-10-05T20:14:21+5:302018-10-05T20:15:04+5:30

किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली.

Four arrested for prostitution business; 12 girls released | किवळेत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चौघांना अटक; १२ मुलींची सुटका 

किवळेत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चौघांना अटक; १२ मुलींची सुटका 

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाची कारवाई 

पिंपरी : किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली. तसेच एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल केले असून चौघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. हरीश सिन्ही शेट्टी (वय ४६), अभिषेक मोहन शेट्टी (वय ३२, दोघे रा. साई लॉज, किवळे), रत्नाबहाद्दूर रनबहाद्दूर प्रधान (वय ३४, रा. भोंडवेवस्ती, रावेत), बालाजी रामराव माने (वय २५, रा. सोमाटणे फाटा), लॉजचे मालक शेखर दीपक सांडभोर (रा. किवळे), प्रविण शेट्टी (रा. साई लॉज, किवळे), सागर भोंडवे, विनोद सदानंद शर्मा (दोघे रा. भोंडवेवस्ती, रावेत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी हरीश, अभिषेक, रत्नाबहाद्दूर आणि बालाजी यांना अटक केली असून इतर चौघेजण फरार आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांनी साई लॉज येथे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची माहिती मिळविली. त्यानंतर येथे छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. तसेच हरीश आणि अभिषेक यांना अटक केली. त्या दोघांकडे चौकशी करत वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणची माहिती काढली. त्यानुसार भोंडवेवस्ती मधील मुस्कान फर्निचर दुकानाच्या मागच्या बाजूला या मुली राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून नऊ मुलींची सुटका केली. तसेच या मुलींची ने-आण करणाऱ्या बालाजी आणि शेखर यांना अटक केली.  शेखर,  प्रवीण,  सागर,  विनोद हे चौघेजण अद्याप फरार आहेत. या कारवाईत एक मोटार, दोन दुचाकी असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Web Title: Four arrested for prostitution business; 12 girls released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.