बँकेचे कर्ज असलेल्या चारचाकीची विक्री करून फसवणूक

By नामदेव भोर | Published: March 19, 2023 02:27 PM2023-03-19T14:27:13+5:302023-03-19T14:27:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : बँकेचे कर्ज असलेली चारचाकी मालवाहू पिकअप गाडी परस्पर विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या संशयित ...

Fraud by selling a four-wheeler with a bank loan | बँकेचे कर्ज असलेल्या चारचाकीची विक्री करून फसवणूक

बँकेचे कर्ज असलेल्या चारचाकीची विक्री करून फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नाशिक : बँकेचे कर्ज असलेली चारचाकी मालवाहू पिकअप गाडी परस्पर विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या संशयित अझर युनिस मनियार याच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अझर युनिस मनियार याने शशिकांत अशोक कोकणे ( ३७, रा. टेंभी मळा बल्हे, ता. जुन्नर जि. पुणे) यांना ९ जानेवारी २०२१ रोजी दुपरी बारा वाजेच्या सुमारास त्याच्या पाखालरोड येथील कार्यालयात बोलवून घेतले होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या व्यावहारात अझर मनियार याने पिक अप (एमएच १५ जी व्ही ६८४३) या वाहनावर पूर्वीचे ५ लाख ७० हजार रुपयांचे बँकेचे कर्ज असताना ते शशिकांत अशोक कोकणे यांना ५ लाख ४० हजार रुपयांना विक्री ते वाहन विकले. मात्र संशयिताने गाडीचे कोणतेही कागदपत्र कोकणे यांच्या नावावर करून न देता त्यांची फसवणूक केल्याने कोकणे यांनी या प्रकरणात अझर मनियार यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांमनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक बाळू गिते अधिक तपास करीत आहेत

Web Title: Fraud by selling a four-wheeler with a bank loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.