विक्रीकराच्या २४ लाख रकमेचा अपहार ; वसूली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 08:12 PM2018-08-05T20:12:09+5:302018-08-05T20:12:11+5:30
वसुलीतून जमा झालेली २४ लाख ८१ हजार ३०१ रुपयांची रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता परस्पर या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या एका वसुली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : वसुलीतून जमा झालेली २४ लाख ८१ हजार ३०१ रुपयांची रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता परस्पर या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या एका वसुली अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमेंद्र ब्रिजलाल सोनकर (वय ४५, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या वसूली एजंटाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमेंद्र महाराष्ट्र शासनाचे एक प्रकारे विश्वस्त आणि एजंट म्हणून काम करतात. विक्री कर वसूलीत ते विक्रीकर विभागास सहकार्य करीत असतात. त्यांनी १ एप्रिल २०१२ ते ४ आॅगस्ट २०१८ च्या कालावधित सुमारे २४ लाख ८१ हजार ३०१ रुपये एवढी कराची रक्कम वसूल केली होती. वसूलीची ही रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ही रक्कम शासकीय तिजोरीत न भरता परस्पर या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. प्रकाश कुलकर्णी (वय ४१, रा. पिंपळेनिलख) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.