आईवरून शिवी दिल्याने मित्राची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 04:46 PM2019-08-30T16:46:27+5:302019-08-30T16:49:20+5:30

 रिक्षात पुढे बसण्यावरून सुरु झाला वाद

A friend kill by knife due to abusive language | आईवरून शिवी दिल्याने मित्राची चाकूने भोसकून हत्या

आईवरून शिवी दिल्याने मित्राची चाकूने भोसकून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देकंदुरीसाठी निघाले होते रवनापराड्याला

औरंगाबाद :  रिक्षात पुढे बसण्यावरून झालेल्या वादानंतर मृताने आरोपीला आईवरून दिलेली शिवी जिव्हारी लागल्याने त्याने चाकूने भोसकून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. कटकटगेट रोडवरील पोलीस अधिकारी मेसजवळ (आयपी मेस) बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, शेख रेहान शेख पाशू याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहरकर यांनी एक सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

शेख आसिफ शेख खलिक (२५, रा. एस. टी. कॉलनी, फाजलपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेख रेहान शेख पाशू (रा. लेबर कॉलनी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना जिन्सी आणि सिडको पोलिसांनी सांगितले की, अंबड तालुक्यातील रवना पराडा येथे कं दुरीच्या कार्यक्रमास जाण्यासाठी एस. टी. कॉलनी फाजलपुरा, लेबर कॉलनी येथील शेख रेहान, सोहेल, इब्राहिम, रिक्षाचालक शेख वसीम आणि शेख आसिफ यांनी बेत आखला होता. वसीमच्या मित्राच्या कंदुरीचा कार्यक्रम असल्याने त्याच्या रिक्षात केवळ सर्वांनी मिळून पेट्रोल टाकायचे ठरले होते. त्यानुसार सर्वांनी प्रत्येकी शंभर रुपये जमा केले आणि ते कटकटगेटमार्गे जात असताना रिक्षात समोरील सीटवर कोणी बसावे, यावरून मृत आसिफ आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला. पुढे पेट्रोलपंपावर त्यांनी रिक्षात पेट्रोल टाकले. तेथे त्यांच्यातील वाद अधिक पेटला. तेथून पुढे जात असताना आसिफने रेहानला आईवरून शिवी दिली. ही शिवी रेहानच्या जिव्हारी लागली आणि त्याने रिक्षा थांबवायला लावली. आसिफला रिक्षातून ओढत नेऊन त्याच्यावर चाकूने वार केले. यात तो जागीच ठार झाला. आसिफ बेशुद्ध झाल्यानंतर रेहानने आणि वसीम यांनी त्याला रिक्षातून घाटीत दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी आसिफचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आपल्या हातून खून झाल्याचे कळताच रेहान रडू लागला.

कंदुरीसाठी निघाले होते रवनापराड्याला
प्रत्येकी  शंभर रुपये जमा करून पाच जणांनी रिक्षामध्ये पाचशे रुपयांचे पेट्रोल टाकले आणि ते कंदुरी जेवणासाठी अंबड तालुक्यात जात होते. मात्र, रिक्षाच्या मागील सीटवर कोणी बसावे, यावरून दोघांत झालेल्या वादात एकाने दुसऱ्याची भोसकून हत्या केली आणि कंदुरीचा कार्यक्रम अर्धवट राहिला.

Web Title: A friend kill by knife due to abusive language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.