Gadchiroli Encounter: धमकीचे पत्र पाठविणारा नक्षली मारला गेला का? एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 02:09 PM2021-11-14T14:09:51+5:302021-11-14T14:11:48+5:30

Eknath Shinde on Gadchiroli Encounter: सर्व पोलीस आणि जवान त्याठिकाणी जीव धोक्यात घालून काम करत असतात. सुमारे ९ ते १० तास ही चकमक सुरु होती. या कारवाईची दखल सर्व राज्यांनी घेतली आहे.

Gadchiroli Encounter: Was the Naxalite who sent the threatening letter killed? Eknath Shinde said ... | Gadchiroli Encounter: धमकीचे पत्र पाठविणारा नक्षली मारला गेला का? एकनाथ शिंदे म्हणाले...

Gadchiroli Encounter: धमकीचे पत्र पाठविणारा नक्षली मारला गेला का? एकनाथ शिंदे म्हणाले...

googlenewsNext

गडचिरोलीत झालेल्या चकमकीत २६ नक्षलींना पोलिसांनी ठार केले. ही गेल्या वर्षभरातली देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. गडचिरोली पालकमंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन केल्याचे एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. या कारवाईत पोलिसांचे चार जवान जखमी झाले आहेत.  त्यांच्याशी फोनवरून बोललो आहे. शासनाकडून हवी ती मदत त्यांना केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

सर्व पोलीस आणि जवान त्याठिकाणी जीव धोक्यात घालून काम करत असतात. सुमारे ९ ते १० तास ही चकमक सुरु होती. या कारवाईची दखल सर्व राज्यांनी घेतली आहे. यामध्ये मिलिंद तेलतुंबडे या जहाल नक्षलवाद्याला मारण्यात यश आले आहे. छत्तीसगड, आंध्रप्रदेश पोलिसही या नक्षलवाद्यांच्या शोधात होते. तेलतुंबडे हा त्यांचा म्होरक्या होता. 

५० लाखांहून अधिक रुपयांचं तेलतुंबडे वर बक्षीस होते. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता स्थिती पुर्ववत झाली आहे. आपण प्रत्यक्ष जाऊन चकमकीत सहभागी झालेल्या जवानांची भेट घेणार आहे. त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे. मला धमकी देणारा यात मारला गेलाय का याचा तपास पोलीस आणि गृहविभाग करत आहे. अशा अनेकवेळा धमक्या आल्या आहेत त्याला मी घाबरलो नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Gadchiroli Encounter: Was the Naxalite who sent the threatening letter killed? Eknath Shinde said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.