वाटेत उभे हाेते म्हणून टाेळक्यांनी दाेघांवर तलवारीने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 01:47 PM2018-09-12T13:47:24+5:302018-09-12T13:50:39+5:30

वाटेत उभे हाेते म्हणून दाेघांवर टाेळक्यांनी तलवारीने वार केल्याची घटना पुण्यातील काेथरुड भागात घडली अाहे.

gang attack two in kothrud by sword | वाटेत उभे हाेते म्हणून टाेळक्यांनी दाेघांवर तलवारीने केले वार

वाटेत उभे हाेते म्हणून टाेळक्यांनी दाेघांवर तलवारीने केले वार

googlenewsNext

पुणे : कोथरुड मधील सुतारदरा परिसरात १० ते १५ जणांच्या टोळक्यांनी तलवार, कोयत्याने दोघांवर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले असून परिसरातील दुकानांवर दगडफेक करुन दहशत पसरविली़. ही घटना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत किरण अशोक दुडे (वय २७, रा़ किष्कींदानगर, कोथरुड) आणि संतोष बबन दुडे (वय२५, रा़ दत्तनगर, सुतारदरा, कोथरुड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.  दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  याप्रकरणी योगेश गंगाराम साठे (वय २६, रा़ गोळेआळी, सावकारवाडी, पिरगुंट) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धीरज कुडले, साहिल हळंदे व त्याच्या १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुतारदरा येथील दत्तनगरमधील दत्तमंदिराजवळ योगेश साठे हे त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा मारत उभे असताना धीर कुडले, साहिल हळंदे व त्याचे १० ते १५ साथीदार हातामध्ये तलवार व कोयते घेऊन दहशत निर्माण करीत आरडाओरडा करीत  खालच्या दिशेने जात असताना साठे व त्याचे मित्र वाटेत उभे होते. या कारणावरुन त्यांनी शिवीगाळ करीत हातातील तलवार, कोयत्यांनी किरण आणि संतोष यांच्यावर वार केले व त्यांना गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आजू बाजूच्या दुकानावर दगडफेक करुन दहशत निर्माण केली़ त्यामुळे दुकानदारांनी लगेचच आपली दुकाने बंद केली.
 
     या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  तेथील बंदोबस्त वाढविला असून आरोपींच्या संशयितांचा शोध घेतला जात आहे.  गणेशोत्सव गुरुवारपासून सुरु होत असताना सुतारदऱ्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी आपली दहशत पसरविण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अाहे.  यापूर्वीही या भागात दोन टोळ्यांमधील मारामारीत नागरिकांची पार्क केलेली वाहने लक्ष्य करण्याचे प्रकार येथे घडले आहेत.  या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
 

Web Title: gang attack two in kothrud by sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.