अतिक्रमण कारवाई दरम्यान सापडला गांजा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:37 PM2018-12-25T14:37:49+5:302018-12-25T14:38:24+5:30
खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली.
वैभव गायकर
पनवेल - खारघर सेक्टर १० मधील अनधिकृत भंगार दुकानावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला गांजा सापडल्याची धक्कादायक घटना आज घडली. खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली.
या घटनेत गांजा विकणाऱ्या एका महिलेला अतिक्रमण पथकाने खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या महिलेकड़ून १० ग्रामच्या ७ पुड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. एकीकड़े अमली पदार्थ विरोधी पथक कोकेन,गांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नज़र ठेवून असताना खारघरमध्ये सर्रास चरस, गांजा या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघड़ झाले आहे. खारघर शहरात सर्रास गांजा विक्री झाल्याचे उघड़ झाले आहे. ३१ डिसेंबर येत असल्याने पार्टीसाठी अमली पदार्थांचा सुळसुळाट होत असतो.