- मनीषा म्हात्रे मुंबई : समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ मोबाइलमध्ये चित्रीकरण करणे एका इंटेरियर आर्किटेक्चरला भलतेच महागात पडले. दुसऱ्या एका समलैंगिक तरुणासोबतच्या संबंधादरम्यान त्याने हेच व्हिडीओ चोरी करून व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढताच तक्रारदारांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.गोरेगाव पूर्वेकडील उच्चभ्रू वसाहतीत ३२ वर्षीय तक्रारदार आई-वडिलांसोबत राहतात. ते इंटेरियर आर्किटेक्चर आहेत. ते समलैंगिक असून, सहका-यासोबत ठेवलेले लैंगिक संबंधाचे चित्रीकरण त्यांच्या संमतीने त्यांच्या मोबाइलमध्ये ठेवत असे. १ जानेवारी रोजी सकाळी ९च्या सुमारास अचानक त्याच्या मित्रांचे कॉल मोबाइलवर येण्यास सुरुवात झाली. त्यात, परदेशातील सहका-यासोबतच्या लैंगिक संबंधाचे व्हिडीओ टिष्ट्वट केल्याची माहिती त्याला मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधित टिष्ट्वटर हँडलर्सला तो व्हिडीओ डिलीट करण्यास सांगत, तो व्हिडीओ कुठून व कसा मिळाला, याबाबत विचारणा केली. त्याच्या मॉरिशसच्या पार्टनरनेही याबाबत चौकशी सुरू केली. तेव्हा अन्य एकाने बनावट युजर आयडीवरून हे व्हिडीओ पाठविल्याचे टिष्ट्वटर हँडलर्सने सांगितले. पुढे हे व्हिडीओ एका ईमेलवर पाठविण्यात आल्याची माहिती मिळताच, संबंधित स्क्रिनशॉट आणि ईमेल आयडीची माहिती मिळाली. याबाबत अधिक माहिती काढताच हा आयडी रोहित रमीत नावाच्या तरुणाचा असल्याचे समोर येताच तक्रारदार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांनी दिलेल्या माहितीत, सप्टेंबर, २०१९ मध्ये कोलकाता येथे त्यांची रोहितसोबत ओळख झाली. दोघेही एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. याच दरम्यान त्याने त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ पाहिले आणि संधी साधून ते व्हिडीओ चोरी केल्याचा संशय त्यांना आहे. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने पोलिसात धाव घेतली नाही. मात्र, पुढे आणखी चार व्हिडीओ अन्य टिष्ट्वटर हँडलर्सवरून प्रसारित झाल्याने मित्रांचे कॉल वाढले. आरोपी रोहितने हे व्हिडीओ ३१ डिसेंबर रोजी संबंधित वापरकर्त्यांना पाठविल्याचे स्पष्ट झाले.तपास सुरू...या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीतेंद्र भावसार यांनी दिली.
समलैंगिक संबंधाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:31 AM