अल्पवयीन मुलीवर धारधार शस्त्राने हल्ला, केस धरुन ओढत नेलं; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 07:47 PM2023-02-19T19:47:21+5:302023-02-19T19:48:10+5:30

क्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी धावली तेव्हा आरोपीनं तिचा पाठलाग केला.

girl attacked with sharp weapon dragged by hair Video viral crime news chattisgarh police arrested | अल्पवयीन मुलीवर धारधार शस्त्राने हल्ला, केस धरुन ओढत नेलं; Video व्हायरल

अल्पवयीन मुलीवर धारधार शस्त्राने हल्ला, केस धरुन ओढत नेलं; Video व्हायरल

googlenewsNext

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये माथेफिरूने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी जीव वाचवण्यासाठी धावली तेव्हा आरोपीनं तिचा पाठलाग केला. तसंच तिचे केस धरून तिला रस्त्यावर ओढू लागला. यादरम्यान आरोपीने स्वतःवरही वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घटना गुढियारी भागातील आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी आरोपी ओंकार तिवारीच्या मसाला केंद्रात काम करायची. तुमची मुलगी मला द्या, मी तिला पत्नी म्हणून ठेवेन, असं माथेफिरू आरोपीनं तिच्या आईला सांगितलं होतं. पण कुटुंबीयांनी त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या ओंकार तिवारीनं तिच्यावर हल्ला केला.

गंभीर जखमी
शनिवारी रात्री आरोपी हा धारदार शस्त्र घेऊन त्यांच्या घरात घुसला. त्यानंतर कुटुंबीयांशी गैरवर्तन केले. मुलीला मारहाण करून तिच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्रानं वार केले. यादरम्यान जखमी झालेली तरूणी बचाव करण्यासाठी बाहेर पळाली. मात्र धावताना ती रस्त्यावर पडली. मुलीच्या कुटुंबीयांनीही तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत माथेफिरूने पुन्हा तरुणीवर हल्ला केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी केली अटक
रस्त्याच्या मधोमध एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. गुढियारी पोलीस ठाणेही घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर आहे. काही लोकांनी या घटनेची माहिती देताच प्रशासनाने कारवाई करत तरुणाला अटक केली. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: girl attacked with sharp weapon dragged by hair Video viral crime news chattisgarh police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.