Breaking : Hathras Gangrape आणखी एका निर्भयाचा बळी, सामूहिक बलात्कार पीडितेची उपचारादरम्यान मृत्यूची झुंज संपली
By पूनम अपराज | Published: September 29, 2020 01:56 PM2020-09-29T13:56:43+5:302020-09-29T13:57:20+5:30
Hathras Gangrape : प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय मुलीने उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिली आहे. या मुलीवर १४ सप्टेंबर रोजी तिच्या शेतात चार माणसांनी शेतावर जाताना तिच्यावर बलात्कार केला होता. दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्, प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती.
यूपी के जिला हाथरस में एक दलित लड़की को पहले बुरी तरह से पीटा गया, फिर उसके साथ गैंगरेप किया गया, जो अति-शर्मनाक व अति-निन्दनीय जबकि अन्य समाज की बहन-बेटियाँ भी अब यहाँ प्रदेश में सुरक्षित नहीं हैं। सरकार इस ओर जरूर ध्यान दे, बी.एस.पी. की यह माँग।
— Mayawati (@Mayawati) September 27, 2020
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या काळ्या दिवशी ही मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. नंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. हाथरस येथील प्रभारी कोतवाली यांनी त्यांना पोलिस लाइनमध्ये पाठविले. प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेबुलरी (पीएसी) महिलेच्या घरी तैनात होते. बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला होता. उत्तर प्रदेशात कोणत्याही समाजातील कोणतीही महिला सुरक्षित नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्याकडे लक्ष देण्यास सांगितले.
Hathras gang-rape victim was admitted at Safdarjung hospital for better healthcare facilities. She died today morning. More details are awaited: Safdarjung hospital official https://t.co/B67W9ceOlA
— ANI (@ANI) September 29, 2020
यूपी के हाथरस में गैंगरेप के बाद दलित पीड़िता की आज हुई मौत की खबर अति-दुःखद। सरकार पीड़ित परिवार की हर संभव सहायता करे व फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाकर अपराधियों को जल्द सजा सुनिश्चित करे, बीएसपी की यह माँग।
— Mayawati (@Mayawati) September 29, 2020