मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट -एआययू) आज मोठी कारवाई करत ४४ सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. तसेच कोटींची किंमत असलेलं सोन दुबईहुन घेऊन येणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
आज कारवाई दरम्यान ५०० ग्राम वजनाची एकूण ४४ सोन्याची बिस्किटं एआययूने जप्त केली आहेत. या सोन्याच्या बिस्किटांची बाजारात ६ कोटी ७४ लाख ४८ हजार २६० इतकी किंमत आहे. या सोन्याच्या बिस्किटांचे वजन २२ किलो असून अटक आरोपीने सोन्याची तस्करी कोणासाठी केली होती याचा तपास एआययू करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली.