हुंड्यात (Dowry) पैसे, दागिने, गाडी आणि महागडे गिफ्ट घेतल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण औरंगाबादमध्ये (Aurangabad) नवरदेवाने हुंड्यात अशी वस्तू मागितली आहेय ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या परिवाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मुलाकडून हुंड्याची अनोखी डिमांड
द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, औरंगाबादच्या उस्मानपुरामध्ये राहणाऱ्या एका तरूणाचं लग्न रामनगर भागातील एका तरूणीसोबत जुळलं होतं. १० फेब्रुवारी २०२१ ला दोघांचा साखरपुडा झाला होता. दोन्ही परिवारांनी मिळून ठरवलं की लग्न काही महिन्यांनंतर करूया. पण यादरम्यान मुलाकडी लोकांनी मुलीकडील लोकांकडे हुंड्यात (Groom Demands Tortoise With 21 Toenails As Dowry) अनोख डिमांड केली. (हे पण वाचा : हुंड्याच्या विरोधात होता नवरदेव, नवरीकडील लोकांनी ऐकलं नाही अन् दिलं 'हे' किंमती गिफ्ट!)
असं काय मागितलं?
तरूणाकडील लोक म्हणाले की, त्यांना हुंड्यात २१ नखांचं कासव, काळा लॅब्रोडोर कुत्रा आणि १० लाख रूपये पाहिजे. हुंड्याची ही मागणी ऐकून मुलीकडील लोक परेशान झाले. पण त्यांनीही हुशारी दाखवत या लालची लोकांना धडा शिकवण्यासाठी त्यांची पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मुलीकडच्या लोकांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमद्ये बुधवारी नवरदेव आणि त्याच्या परिवाराविरोधात तक्रार दिली.
मुलीकडच्या लोकांनी सांगितलं की, साखरपुड्याआधी त्यांनी नवरदेवाला २ लाख रूपये कॅश आणि १० ग्रॅम सोन हुंड्यात दिलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.