कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. यामुळे पंजाबमध्येही वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. प्रशासनाकडून लोकांना कोविड नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. तरी सुद्धा लोक कोरोनाचा धोका समजून घेत नाहीयेत. एक अशीच घटना पंजाबच्या जालंधरमधून समोर आली आहे. इथे एका लग्न समारोहात १०० पेक्षा जास्त लोक एकत्र जमले होते. पोलिसांना याची माहिती मिळाली तर त्यांनी लगेच कारवाई केली.
पोलिसांनी याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या आजोबाला ताब्यात घेतलं. लग्न मंडपात १०० पेक्षा जास्त उपस्थित होते. नियमानुसार, लग्नात २० लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी घेणं गरजेचं आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, परिवाराने अशाप्रकारची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तर पोलिसांनी कारवाई करत नवरदेव आणि त्याच्या आजोबाला सरकारी गाडीत बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा नवरदेव आणि त्याच्या आजोबाची चौकशी करण्यात आली तर त्यांनी सांगितले की, इतके लोक लग्नात कसे आणि कुठून आले याची त्यांना काहीच माहिती नाही. नवरदेवाने पोलिसांना सांगितले की, केवळ २० लोकांनाच लग्नात बोलवलं होतं. इतके लोक कुठून आले त्यांना याची कल्पना नाही.
पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आजोबासोबतच चार लोकांविरोधात केस दाखल केली आहे. तसेच दोन तासांनंतर नवरदेव आणि त्याच्या आजोबाला समज देऊन जामिनावर सोडलं आहे. नंतर नवरदेव नवरीला घेऊन घरी गेला. आता ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
याप्रकऱणी पोलीस स्टेशनचे प्रभारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, त्यांना माहीत मिळाली होती की, एका मंदिरात लग्न सोहळा सुरू होता. लग्नात भरपूर लोक होते. दोन्ही पक्षाकडील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. नंतर जामिनावर सोडण्यात आलं.