Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 06:17 PM2020-10-01T18:17:56+5:302020-10-01T18:22:39+5:30

प्रशांत कुमार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातही संबंधित तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आरोपच केला होता. (Hathras Case, Uttar pradesh)

Hathras Case ADG prashant kumar says forensic report makes clear woman was not raped  | Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार

Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार

googlenewsNext
ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 'त्या' 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही - एडीजीगेल्या 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागात घडली होती घटना.या प्रकरणावरून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली आणि आता राजकारणही तापले आहे.

हाथरस -उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 'त्या' 19 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही. तिचा मृत्यू गळ्याला जबर मार (दुखापत) लागल्याने आणि त्यामुळे बसलेल्या धसक्याने झाला. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालावरूनही तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट होते, असा दावा उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार (ADG Prashant Kumar) यांनी मंगळवारी केला.

प्रशांत कुमार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातही संबंधित तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आरोपच केला होता. एवढेच नाही, तर सामाजिक सौहार्द खराब करण्यासाठी आणि जातीय हिंसाचार निर्माण करण्यासाठी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. पोलिसांनी हाथरसप्रकरणी तत्काळ कारवाई केली आणि आता आम्ही ज्या लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यात जातीय हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचा शोध घेणार आहोत, असेही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.

पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली - 
प्रशांत कुमार म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याच्या तपासासाठी विशेष शोध पथक तयार केले. एवढेच नाही, तर या घटनेत ज्यांचा समावेश आहे. त्यांना कदापी क्षमा केली जाणार नाही. 'वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी सरकारविरोधात चुकीची वक्तव्ये करण्यात आली आणि पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली. हे सर्व कुणी केले याचा आम्ही शोध घेणार आहोत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि सरकार तथा पोलीस महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत.'

14 सप्टेंबरला झाली होती घटना -
एडीजी म्हणाले, आकडेवारीचा विचार केल्यास, 2018 आणि 2019मध्ये, महिलांसंदर्भातील गुन्हांत शिक्षा देण्यात उत्तर प्रदेश अव्वल आहे. गेल्या 14 सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागात 19 वर्षांच्या एका मुलीवर कथीत बलात्कार केल्याचे म्हटले जात आहे. घटनेच्यावेळी तिचा गळा दबण्यात आला. याच वेळी तिची जीभही तुटली होती.

घटनेनंतर संबंधित तरुणीला अलिगड येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, येथेच मंगळवारी तिचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली आणि आता यावरून राजकारणही तापले आहे.

Web Title: Hathras Case ADG prashant kumar says forensic report makes clear woman was not raped 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.