हाथरस - कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर आरोपींनी मुलीची जीभ कापली आहे. अलीगढ येथील जेएन मेडिकल कॉलेजमध्ये मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसच्या चंदपा परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. गावातील चार तरुणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी मुलीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये मुलीला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. गुन्हा दाखल केला होता. मात्र काही दिवसांनी त्याला सोडून दिलं. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेच्या नऊ दिवसांनंतर मुलगी शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...
रियाणाच्या पानीपतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. तब्बल पाच लाखांसाठी जन्मदात्या आईने आपल्या मुलीला विकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीचं तिच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात आलं. मात्र चाईल्ड लाईनला वेळीच या प्रकाराची माहिती मिळाल्याने मुलीची सुखरुप सुटका करण्यात यश आलं आहे. एका 17 वर्षीय मुलीला पाच लाख 60 हजारांत तिच्या आईने विकलं. त्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीसोबत तिचं लग्न लावण्याचा प्रकार सुरू होता. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने मुलीची सुटका करण्यात आली आहे.
बाल कल्याण समितीच्या संचालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 'गावातील एका व्यक्तीने मुलीला तिच्या आईकडून काही पैसे देऊ विकत घेतलं. आणि तिचं लग्न गावातील 40 वर्षीय विक्रम याच्यासोबत लावून दिलं. मुलीने या धक्कादायक प्रकाराची माहिती चाईल्ड लाईनला दिली. त्यानंतर हा प्रकार बाल कल्याण समिती रोहतक यांच्याजवळ पोहोचला. माहिती मिळताच बाल कल्याणची एक टीम गावात पोहोचली. त्यांनी मुलीचा शोध घेतला आणि तिची सुखरुप सुटका केली' अशी माहिती पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल
"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात
लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च
शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अॅप्स
टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?