बाबो! पाच गर्लफ्रेंडसची हौस भागविण्यासाठी पठ्ठ्या करत होता मोबाईल चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 07:34 PM2020-10-29T19:34:05+5:302020-10-29T19:34:36+5:30
Mobile Robbery : मोबाईल चोरटा गजाआड
कल्याण: कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी एका मोबाईल चोरटयाला अटक केली आहे. त्याच्या चोरीचे कारण जाणून घेता एक दोन नव्हे तर चकक पाच गर्लफ्रेंडसची हौस भागविण्यासाठी तो मोबाईल चोरत असल्याचे समोर आले आहे. निखिल ठाकरे असे या चोरटयाचे नाव असून त्याच्याकडून दहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. एका साथीदाराच्या मदतीने हा चोरटा मोबाईल हिसकावून पळ काढायचा.
कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. दुचाकीवर स्वार होऊन आलेले दोन चोरटे लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार व्हायचे. कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरु णाचा मोबाईल हिसकावून चोरटयांनी पळ काढल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या मदतीने महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या पथकाने केलेल्या तपासात यश आले असून भिवंडी येथे राहणा-या निखिल ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईल हस्तगत केले. कल्याणमधील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने अन्य मोबाईल कुठून चोरले आहे याचा तपास सुरु आहे. तसेच, त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. निखिल याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे हे दाखविण्यासाठी निखिलने मोबाईल चोरणे सुरु केले. या सोबतच पोलिसांनी दुस-या प्रकरणातील दोन मोबाईल चोरटे गजाआड केले आहेत. यात अविनाश विठ्ठल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.