हितेंद्र ठाकुरांच्या पुतण्याला, सीएला अटक; ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 01:44 PM2021-01-23T13:44:42+5:302021-01-23T13:45:21+5:30

Viva Group, PMC bank Fraud Case : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे.

Hitendra Thakur's nephew Mehul Thakur, CA arrested; ED action | हितेंद्र ठाकुरांच्या पुतण्याला, सीएला अटक; ईडीची कारवाई

हितेंद्र ठाकुरांच्या पुतण्याला, सीएला अटक; ईडीची कारवाई

googlenewsNext

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर छापा टाकला होता. आज सकाळी ईडीने ठाकूर यांचा पुतण्या आणि मेहुल ठाकूर आणि संचालक सीए मदन चतुर्वेदी यांना अटक केली आहे. 


पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून ईडीने त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. दरम्यान, काही महत्त्वाची कादगत्रे ईडीच्या हाती लागल्याची सुत्रांची माहिती आहे.


दरम्यान, प्रवीण राऊत हा एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. राऊतने ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. त्यातील ५५ लाख पुढे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिले होते. त्यानुसार वर्षा यांच्याकडेही ईडीने चौकशी केली. त्यानंतर त्यांनी ते पैसे परत केले.


जे काही व्यवहार असतील त्याचे स्पष्टीकरण देऊ - ठाकूर
ईडीचे अधिकारी आले असून ते चौकशी करतील. अद्याप माझ्यापर्यंत कोणीही आलेले नाही. ते त्यांचे काम करत आहेत. नाव कशातही येऊ द्या. जे काही व्यवहार आहेत त्याचे स्पष्टीकरण आम्ही देऊ, असे ठाकूर यांनी सांगितले होते. 

Web Title: Hitendra Thakur's nephew Mehul Thakur, CA arrested; ED action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.