धक्कादायक! कापूस, हळदीच्या पिकांमध्ये होमगार्डने केली गांजाची शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 06:45 PM2020-09-13T18:45:44+5:302020-09-13T18:47:20+5:30
औंढा नागनाथ तालुक्यात तीन ठिकाणी छापे; गांजाची शेती करणाऱ्यांना अटक
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी तीन ठिकाणी छापे मारून गांजाची शेती करणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ रविवारी औंढा तालुक्यातील धारखेडा येथे होमगार्ड पदावर कार्यरत असलेल्या एकाने कापूस व हळदीच्या पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले.
औंढा नागनाथ तालुक्यात उमरा शिवारात शनिवारी पोलीस प्रशासन मोठी कारवाई करीत गांजाची शेती करीत असल्याची बाब उघडकीस आणली होती. रविवारी औंढा तालुक्यातील धारखेडा येथे गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जगदीश भंडारावार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धारखेडा येथील वसंत कराळे यांच्या शेतामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घेवारे, सविता वाकळे, किशोर पोटे, मुकुंद घार, सचिन मस्के, सुनील अंभोरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी शेतामध्ये धाड टाकली. या शेतात असलेल्या कापूस व हळदीच्या अंतर पिकामध्ये गांजाची शेती होत असल्याचे दिसून आले.
पूर्ण शेताची पाहणी केली असता असता गांजाची 50 ते 60 झाडे आढळून आली. त्या झाडांची उंची चार ते सहा फुटापर्यंत आहे. अजून काही झाडे आहेत काय याचा शोध पोलीस अधिकारी व व कर्मचारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां शोध घेत आहेत अजून या बाबत गुन्हा दाखल झालेला नाही. शेतात अजून शोध सुरूच आहे. चक्क होमगार्ड या पदावर असलेल्या शेतकऱ्यांनी अश्या प्रकारे गांजाची शेती करण्याच धाडस केल्याने हा प्रकार औंढा तालुक्यात अन्य ठिकाणी होत आहे काय, याची पोलीस प्रसासनाकडून माहिती घेतली जात आहे.