पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका विवाहित व्यक्ती दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात होती. अशात अचानक त्याची पत्नी तिथे पोहोचली आणि तिथे तिने गोंधळ घातला. आरोप आहे की, एक व्यक्ती पत्नी आणि एक मुलगी असून फसवून दुसरं लग्न करत होता.ही घटना फिरोजपूरच्या गुरूहर सहाय भागातील आहे. रिपोर्टनुसार, बूटा सिंह नावाच्या तरूणाचं लग्न १३ महिन्यांआधी सुनीता नावाच्या एका तरूणीसोबत झालं होतं. लग्नानंतर सुनीता आणि बूटा सिंह यांच्यात काही वाद झाला. यानंतर सुनीता सासरच्यांवर मारझोड केल्याचा आरोप लावत माहेरी निघून गेली. तिथेच तिने एका मुलीला जन्म दिला. (हे पण वाचा : जिम ट्रेनरने नाव बदलून केलं लग्न, प्रेग्नन्सीनंतर तरूणी डॉक्टरकडे गेली तेव्हा झाला खुलासा!)
पती बूटा सिंहसोबत वाद मिटवण्यासाठी गावात अनेक पंचायत बोलवलण्यात आल्या. पण दोघांमधील वाद काही मिटला नाही. यादरम्यान सुनीताला माहिती मिळाली की, तिचा पती दुसरं लग्न करतो आहे. ज्यानंतर ती तिच्या नातेवाईकांना घेऊन थेट लग्न मंडपात पोहोचली आणि तिथे गोंधळ घातला.
दुसरीकडे बूटा सिंहचं आधीच लग्न झाल्याचं समजलं तेव्हा मुलीकडच्या लोकांनी ही सोयरीक तोडली आणि त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बूटा सिंहला पोलिसांनी अटक केली. (हे पण वाचा : महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न!)
नंतर त्याला जामीन मिळाला. यानंतर बूटा सिंहची पहिली पत्नी तिच्या नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागली. पीडिता सुनीताने सांगितले की, बूटा सिंहसोबत तिचं लग्न १६ फेब्रुवारी २०२० मध्ये झालं होतं. मात्र, त्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याने तो तिला मारहाण करत होता. त्यानंतर त्याने तिला घरातून काढून दिले.