राजस्थानमधील भिलवाडा येथे एका व्यक्तीने सासरच्या घरात गोंधळ घातला. या व्यक्तीच्या पत्नीने माहेरून येण्यास नकार दिला. यावरून संतप्त झालेल्या तरुणाने गोंधळ घातला. जावई सासरच्या घरी पोहोचला आणि सासरच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या काचा फुटल्या. यानंतर त्याने गोठ्यालाही आग लावली, त्यामुळे तेथे बांधलेली 5 जनावरं दगावली आहेत. जावयाचं असं रूप पाहून सासरेच नव्हे तर शेजारीही घाबरले. दुसरीकडे, सासरच्यांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा येथील आसींद परिसरात हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. गोपीलाल सारस्वत यांचा जावई किशन हा त्याच्या पत्नीला तिच्या माहेरहून सासरच्या घरी घेऊन येण्यासाठी आला होता. मात्र, पत्नीने सासरी जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने किशनने सासरच्या घरात गोंधळ घातला. दगडफेक आणि जाळपोळ करून तो तेथून निघून गेला.
किशनचे पूजासोबत दहा महिन्यांपूर्वी लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी पतीने शारीरिक अत्याचार केल्याने पूजा माहेरी गेली. तिने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हाही दाखल केला. त्यामुळे किशन बराच वेळ रागावत होता. याच दरम्यान, रविवारी रात्री बाराच्या सुमारास तो सासरच्या घरी आला.
मिळालेल्या माहितीनुसार, किशन रविवारी पत्नीला घेण्यासाठी आला होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तिला पाठवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याने प्रथम दगडफेक करून घराच्या काचा फोडल्या. नंतर गोठ्याला आग लागली, त्यात पाच जनावरे गेली. जावयाच्या या कृत्याविरुद्ध सासरच्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"