चटणी बनवण्यासाठी शेजाऱ्याकडे मागितले टोमॅटो, संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 03:11 PM2022-12-09T15:11:27+5:302022-12-09T15:11:37+5:30

Crime News : घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पत्नीच्या हत्येसाठी पोलिसांनी आरोपी भगत राम अगरिया याला अटक केली आहे.

Husband killed wife because she went to borrow tomato from neighbor in Chhastigarh | चटणी बनवण्यासाठी शेजाऱ्याकडे मागितले टोमॅटो, संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या

चटणी बनवण्यासाठी शेजाऱ्याकडे मागितले टोमॅटो, संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या

Next

Crime News :  छत्तीसगढच्या रायगढ जिल्ह्यातून पत्नीच्या हत्येची एक धक्कादायक घटना समोर आलं आहे. इथे पतीने पत्नीला काठीने मारून तिची हत्या केली. आरोपीने आपल्या पत्नीला मारलं कारण तिने चटणी बनवण्यासाठी शेजाऱ्याकडे टोमॅटो मागितला होता आणि तो घेण्यासाठी ती त्याच्या घरी जात होती. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पत्नीच्या हत्येसाठी पोलिसांनी आरोपी भगत राम अगरिया याला अटक केली आहे.

ही घटना भेडीमुडा गावातील आहे. जी गुरूवारी घडली. पोलिसांनी सांगितलं की, 50 वर्षीय भगत राम अगरियाने काठीने मारत आपली पत्नी दिलो बाई अगरियाची हत्या केली. ती 45 वर्षांची होती. कारण त्याने मनाई केल्यावरही त्याची पत्नी शेजाऱ्याच्या घरी टोमॅटो मागायला जात होती. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

घटनेची सूचना मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. महिलेचा मृतदेह जमिनीवर पडला होता आणि आरोपी घटनास्थळावरून फरार होता. कुटुंबियांच्या सूचनेवर काही तासांमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. कोर्टात हजर केल्यावर त्याला रिमांडवर तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

आरोपीचे वडील इन्दरसाय अगरिया यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांची सून शेजाऱ्याच्या घरी टोमॅटो मागायला जात होती. मुलाने नकार दिला. ज्यावरून दोघांमध्ये वाद पेटला आणि भगत राम घराबाहेरील काठी घेऊन आला. त्याने तिला मारहाण केली. ज्यानंतर ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपीच्या वडिलांच्या जबाबावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. 

Web Title: Husband killed wife because she went to borrow tomato from neighbor in Chhastigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.