Shocking! पतीने पत्नीचे आंघोळीचे अन् कपडे बदलतानाचे व्हिडीओ भावोजीला पाठवले, ब्लॅकमेलिंगनंतर रेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:03 PM2021-08-21T18:03:49+5:302021-08-21T18:07:30+5:30
पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात एफआयआर दाखल केला.
एका तरूणाने पत्नीचे आंघोळ करतानाचे, झोपतानाचे आणि कपडे बदलतानाचे अश्लील व्हिडीओ बनवून आपल्या भावोजीला पाठवले. त्यानंतर भाओजीने ग्वाल्हेरला येऊन आपल्या मेहुण्याच्या पत्नीवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेप केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे.
पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात एफआयआर दाखल केला. केस दाखल झाल्यावर ग्लाव्हेरमध्ये पोलिसांनी आरोपी पतीला अटक करत तुरूंगात पाठवलं. तर आरोपी भावोजीने म्हणजे रायपूरमध्ये माजी मंत्र्याच्या सुरक्षेत कार्यरत असलेल्या पीएसओने सुसाइड नोट लिहून स्वत:वर बंदुकीची गोळी झाडून घेत आत्महत्या केली. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने स्वत:वर घडवून आणला Acid Attack आणि...)
सुसाइड नोटमध्ये भावोजीने मेहुण्याच्या पत्नीकडून आणि सासऱ्याकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याबाबत लिहिलं आहे. मृतकाची पत्नी जवळपास दीड महिन्यापूर्वी रायपूरला निघून गेली होती. सुसाइड नोटमद्ये ३० लाख रूपये मागितल्या बाबतही लिहिलं आहे. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डला द्यायचं होतं महागडं गिफ्ट, तरूणाने चाकूचा धाक दाखवत एकाला लुटलं)
पोलीस अधिकारी विवेक अष्ठाना म्हणाले की, महिलेने तक्रार दाखल केली होती. तिचा पती गपचुपपणे तिचे अश्लील व्हिडीओ बनवून भाओजीला पाठवत होता. भावोजी रायपूरमध्ये व्हिआयपी बटालियनमध्ये कार्यरत आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा भावोजी घरी आला तेव्हा पतीसमोरच त्याने अश्लील चाळे केले. जेव्हा महिलेने पतीकडे तक्रार केली तर त्याने तिला भावोजीसोबत संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. नंतर भावोजीने तिच्यावर रेप केला. नंतर आरोपीने पडाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये जाऊन तिच्यावर रेप केला.