चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 04:56 PM2020-05-23T16:56:56+5:302020-05-23T16:57:27+5:30

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील नितेश जाधव (३०) याच्याशी वाद घातला.

Husband murders wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पोरज : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीने पत्नीचा खून केला. ही घटना घटना शुक्रवारी रात्री १० वाजता नांद्री येथे  घडली.
 नांद्री येथील राजेंद्र रायभान बोदडे (३६) हा आपली पत्नी हर्षाबाई आणि तीन मुलांसोबत राहतो. घटनेच्या दिवशी तो पत्नी सोबतच शेतात गेला होता. मात्र, घरी परत येत असताना तो एकटाच परत आला. त्यामुळे गावातील नागरिकांना त्याच्यावर संशय आला.  दरम्यान रात्री उशीरापर्यंत आई परत न आल्याने त्याच्या मुलांनी आणि गावातील नागरिकांनी हर्षाबाईचा शनिवारी सकाळी शोध घेतला असता,  तिचा शोध घेतला असता. हर्षाबाई राजेंद्र बोदडे हिचा मृतदेह गावा शेजारील एका नाल्यात आढळून आला.
 दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील नितेश जाधव (३०) याच्याशी वाद घातला. त्यालाही कुºहाडीने मारून जखमी केले. त्यामुळे नितेशला सामान्य रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. उपचारानंतर नितेशला सुटी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे नांद्री गावात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने गावातील एकाशी वाद घातला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच  खामगावचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली.  (वार्ताहर)

Web Title: Husband murders wife on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.