बाबो! पत्नीच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि..., सावध व्हा ही बातमी वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:41 PM2023-06-16T12:41:25+5:302023-06-16T12:44:08+5:30
Crime News : पतीने मोबाइल हिसकावून घेतला म्हणून पत्नी जे केलं ते वाचून व्हाल हैराण, पतीने सांगितला पूर्ण घटनाक्रम.
Crime News : जगाच्या कानाकोपऱ्यातून रोज पती-पत्नीच्या भांडणांच्या एकापेक्षा एका हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. काही घटना तर इतक्या विचित्र असतात की, विश्वासही बसत नाही. अलिकडे तर छोट्या छोट्या गोष्टींवरून भयावह कृत्ये केली जातात. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचं कारण वाचाल तर तुमचं डोकं चक्रावून जाईल.
ग्वाल्हेरच्या माधवी नगरमधील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. इथे एका महिलेने पतीच्या गुप्तांगावर उकडतं तेल टाकलं, कारण त्याने तिला शेजाऱ्यासोबत फोनवर बोलण्यास मनाई केली होती. सुनील धाकड या तरूणाने आपली पत्नी भावना हिला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत फोनवर बोलण्यास मनाई केली होती.
पण त्याची पत्नी भावनाने पतीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिने शेजाऱ्यासोबत बोलणं बंद केलं नाही. त्यामुळे एक दिवस संतापलेल्या सुनीलने पत्नीकडून मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर पत्नी इतकी रागावली की, तिने धक्कादायक कृत्य केलं.
पोलिसांकडून सांगण्यात आलं की, सुनील आपल्या घरात झोपलेला होता. त्याचवेळी भावनाने किचनमध्ये तेल गरम केलं आणि ते तेल झोपलेल्या सुनीलच्या गुप्तांगावर टाकलं. ज्यामुळे सुनील गंभीर जखमी झाला. इतकंच नाही तर यानंतर भावना घरातून फरार झाली. सुनीलवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी भावनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित सुनीलने पोलिसांना सांगितलं की, मोबाइल हिसकावून घेण्याचा पत्नीला इतका राग आला की, तिने रात्री मी झोपेत असताना माझ्या गुप्तांगावर उकडतं तेल टाकलं आणि पळून गेली. सुनीलने मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा काही शेजारी त्याच्या घरात आले. त्यांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस त्याची पत्नी भावनाचा शोध घेत आहेत.