पतीच्या मित्रानेच पाठविले अश्लिल मेसेज आणि फोटो ; चिंचवडमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:47 AM2020-06-09T11:47:16+5:302020-06-09T11:49:16+5:30
आरोपी याने फिर्यादींच्या भाचीला देखील फोनवर मेसेज करून त्रास दिला होता.
पिंपरी : पतीच्या मित्राने सोशल मीडियावरून अश्लिल फोटो व मेसेज करून विनयभंग केला. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे सोमवारी हा प्रकार घडला.
याप्रकरणी चिंचवड येथील ४७ वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचे पती यांचा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्यामुळे फिर्यादी त्याला ओळखतात. त्यांना रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाइल फोनमध्ये व्हॉटस अॅपवर आरोपी याच्या फोन क्रमांकावरून अश्लिल फोटो व मेसेज आलेला दिसला. त्यामुळे फिर्यादी घाबरल्या. त्यांनी ते फोटो व मेसेज डिलीट केला. तसेच सदरचा फोन नंबर त्यांनी ब्लॉक केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. ८) फिर्यादी यांना त्यांच्या फोनमधील व्हाटस अॅपवर एका फोन नंबरवरून अश्लिल फोटो व मेसेज आल्याचे दिसले. त्यांनी याबाबत त्यांच्या पतीला सांगितले. सदरचा व्हॉटस अॅप नंबर हा आरोपी याचा असल्याची खात्री केली.
आरोपी याने फिर्यादींच्या भाचीला देखील फोनवर मेसेज करून त्रास दिला होता. त्याबाबत त्याला सूचना देखील देण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.