उल्हासनगर : कॅम्प नं-४, सतरामदास रुग्णालया समोरून शनिवारी रात्री १ वाजता धक्का लागल्याच्या रागातून त्रिकुटाने राजेश कुकरेजा यांना मारहाण झाली. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाल्यावर, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सिसिटीव्ही कॅमेऱ्यात मारहाण झालेल्या त्रिकूटवर गुन्हा दाखल करण्यात आले.
उल्हासनगर कॅम्प नं-४, सतरामदास रुग्णालय याठिकानाहून शनिवारी रात्री १ वाजता जाणाऱ्या राजेश कुकरेजा यांचा धक्का बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडीया व मनीष बिहारी दुसेजा यांना लागला. यावेळी धक्का लागला या रागातून त्रिकुटाने राजेश कुकरेजा याला भररस्त्यात जबर मारहाण केली. मारहाणीत जबर मुकामार लागल्यावर, राजेश कुकरेजा यांनी घरी जाण्या ऐवजी शेजारील पार्किंग केलेल्या रिक्षात झोपून राहिले. मात्र सकाळी पोटात दुखत असल्याने, राजेशने मुलगा तरुण याला फोन केला. वडिलांची गंभीर तब्येत बघून मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविले.
मध्यवर्ती रुग्णालय पोलिसांनी हाणामारीची घटना असल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी माहिती दिली. कुकरेजा यांना श्वासचा त्रास सुरू झाल्याने, त्यांना कळवा येथील रुग्णालयात व तेथून मुंबई केईएम रुग्णालयात हलविले. सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याने, विठ्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या व्हिडीओवरून बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडीओ व मनीष दुसेजा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.