भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला, जो १० दिवस होता. या छाप्यात आयकर अधिकाऱ्यांनी बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्य निर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे टाकले. या कालावधीत ३५२ कोटी रुपयांची मोठी रक्कम जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हा छापा चर्चेत आहे आणि आयकर विभागाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
छाप्यादरम्यान, आयकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला. तसेच या ऑपरेशनसाठी ३६ नवीन मशीन्सची व्यवस्था देखील केली, जेणेकरून नोटांची मोजणी करता येईल. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर आयकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले.
ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचं सांगण्यात येत आहे. आयकर विभागाने छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले. हे ऑपरेशन यशस्वी झालं आहे.
केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केलं होतं, ज्यात प्रधान आयकर अन्वेषण संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. हा छापा आयकर विभागाच्या यशाचं प्रतीक ठरलाय यासोबतच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचंही यातून सिद्ध झालं.