भारतात बिटकॉईनचे पहिले एटीएम सापडले; मालकाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:45 PM2018-10-24T15:45:47+5:302018-10-24T15:47:10+5:30
एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉईन टेक्नॉलॉजीसचे सहसंस्थापक हरीश बीव्ही (वय ३७) याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बेंगळुरू - भारतात बेकायदेशीररीत्या सुरु केलेले बिटकॉइनएटीएमवर सायबर गुन्हे पोलिसांनी कारवाई करत सील केले आहे. युनोकॉईन या कंपनीने हे एटीएम बेंगळुरूतील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील केम्स फोर्ट मॉलमध्ये हे एटीएम नुकतेच सुरु केले होते. बिटकॉइनच्या खरेदी आणि विक्रीसाठी हे एटीएम सुरु करण्यात आले होते. भारतात बिटकॉइनच्या व्यवहारावर बंदी असूनहे एटीएम सुरु करण्यात आले होते. एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉईन टेक्नॉलॉजीसचे सहसंस्थापक हरीश बीव्ही (वय ३७) याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईदरम्यान सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ लॅपटॉप, १ मोबाइल, ३ क्रेडिट कार्ड्स, ५ डेबिट कार्ड्स, १ क्रिप्टोकरन्सी डिवाइस, पासपोर्ट आणि १ लाख ७९ हजार रुपये रक्कम हस्तगत केली आहे.
Bengaluru: Cyber Crime Police seized 2 laptops,1 mobile, 3 credit cards, 5 debit cards, 1 cryptocurrency device and 1.79 lakhs cash from UNOCOIN cryptocurrency company yesterday. UNOCOIN had opened an ATM Kiosk in Old Airport Road at The Kemp Fort Mall. One arrested. #Karnataka
— ANI (@ANI) October 24, 2018