गुजरातमध्ये हाथरसची पुनरावृत्ती, रेल्वे ट्रॅकवर सापडली जखमी तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 06:27 PM2020-10-13T18:27:52+5:302020-10-13T18:33:40+5:30

Crime News : एकीकडे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून देशभरात संतापाचे वातावरण असताना गुजरातमधील सूरतमधील पलसाणामध्ये गंगाधरा येथील गंगापूर रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे.

injured girl found on railway track in Surat in Gujarat | गुजरातमध्ये हाथरसची पुनरावृत्ती, रेल्वे ट्रॅकवर सापडली जखमी तरुणी

गुजरातमध्ये हाथरसची पुनरावृत्ती, रेल्वे ट्रॅकवर सापडली जखमी तरुणी

Next
ठळक मुद्देगुजरातमधील सूरत येथे रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी जखमी अवस्थेत सापडली तिच्या प्रायवेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होतातरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. तिच्या शरीराला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे

मुंबई - गुजरातमधील सूरत येथे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथील रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी जखमी अवस्थेत सापडली आहे. या तरुणीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणीवर रुगणालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी या तरुणीवर उपचार सुरू केले असून, तिची वैद्यकीय चाचणी करण्याची तयारी सुरू आहे.

एकीकडे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून देशभरात संतापाचे वातावरण असताना गुजरातमधील सूरतमधील पलसाणामध्ये गंगाधरा येथील गंगापूर रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. ती गंभीररीत्या जखमी झालेली होती. त्यानंतर कुणीतरी एक महिला पडली असल्याची माहिती कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर या तरुणीला त्वरित सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आले. तिची गंभीर अवस्था पाहून अ‍ॅम्ब्युलन्समधील कर्मचारीसुद्धा हादरले होते.

पीडित तरुणीच्या एका हाताला आणि एका पायाला दुखापत झाली होती. तिच्या ओठांवर जखमा होत्या. तसेच तिच्या प्रायवेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. तरुणीवर उपचार करणारे चिफ मेडिकल ऑफिसर डॉ. ओमकार चौधरी यांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. तिच्या शरीराला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे. तसेच तिच्या गुप्तांगामध्ये मोठी जखम झाली आहे. त्यामुळे ही अपघाताची घटना असू शकत नाही. या तरुणीसोबत काही वाईट घडले असण्याची शंका आहे.

दरम्यान, या तरुणीसोबत काय झालंय याची माहिती वैद्यकीय अहवालांनंतरच समोर येऊ शकेल. सध्या ही तरुणी बेशुद्धावस्थेत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणीच्या शरीरावर असलेल्या घावांवरून ही घटना २४ तासांमध्ये घडली असण्याची शक्यता आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: injured girl found on railway track in Surat in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.