दोन विद्यार्थिनींना इन्स्टाग्राम मित्राने मुंबईत बोलावले, अन् एकीलाच घेऊन धूम ठोकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:40 PM2020-03-06T15:40:22+5:302020-03-06T15:46:16+5:30

एकटी मुंबईला सापडली तर दुसरीच्या शोधात पोलीस उत्तर प्रदेशला रवाना

An Instagram friend called two students in Mumbai, took one of them and get disappeared pda | दोन विद्यार्थिनींना इन्स्टाग्राम मित्राने मुंबईत बोलावले, अन् एकीलाच घेऊन धूम ठोकली

दोन विद्यार्थिनींना इन्स्टाग्राम मित्राने मुंबईत बोलावले, अन् एकीलाच घेऊन धूम ठोकली

Next
ठळक मुद्देसध्या ती दुसरी मुलगी उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली असून राज्यातील मायणा कुडतरी पोलिसांचे एक पथक तेथे रवाना झाले आहे.मागाहून रेल्वे पोलिसांना स्थानकावर गांगरलेल्या अवस्थेत असलेली ती विद्यार्थिनी सापडल्यानंतर चौकशी केली असता ती गोव्याहून आल्याचे समजले.

मडगाव - गोव्यातील दवर्ली येथील त्या दोन शालेय विद्यार्थिंनींना इन्ट्राग्रामवरील मैत्री महागात पडली असून मंगळवारी अपहरण झालेल्या त्या दोनपैकी एक मुलगी मुंबईत सापडली आहे तर अन्य एकीचा तपास चालू आहे. सध्या ती दुसरी मुलगी उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली असून राज्यातील मायणा कुडतरी पोलिसांचे एक पथक तेथे रवाना झाले आहे.


मंगळवारी दोन शालेय विद्यार्थीनीचे अपहरण झाल्याची तक्रार मायणा कुडतरी पोलिसांत नोंद झाली होती. अज्ञाताविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ व गोवा बालकायदा कलम ८ अंतर्गंत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. सोशल मिडियावरुन या मुलींची एका युवकाकडे मैत्री झाली होती. त्या मुलाने त्यांना मुंबईमध्ये भेटण्यासाठी येण्यास सांगितले होते. त्या मुलीपैंकी एकीने शाळेत निरोप समारंभ असल्याने आपल्या आईकडून पैसे घेतले होते. रक्कम घेउन त्या दोघीही रेल्वेमार्गे मुंबईला गेल्या. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर संशयित त्यांना भेटलाही. संशयिताने एकीला रेल्वे स्टेशनवरच सोडून देऊन दुसऱ्या मुलीला घेऊन धुम ठोकली. मागाहून रेल्वे पोलिसांना स्थानकावर गांगरलेल्या अवस्थेत असलेली ती विद्यार्थिनी सापडल्यानंतर चौकशी केली असता ती गोव्याहून आल्याचे समजले. मागाहून पोलिसांनी गोवा पोलिसांकडे संपर्क साधला.

Web Title: An Instagram friend called two students in Mumbai, took one of them and get disappeared pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.