मैं अपनी नजर में गिर गई हूं! असं म्हणत व्यावसायिकाच्या पत्नीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:04 PM2020-01-23T22:04:56+5:302020-01-23T22:06:36+5:30
आपल्या सुसाईडड नोटद्वारे काही रहस्येही मागे सोडली आहेत.
नवी दिल्ली - अॅटलास या सायकल कंपनीच्या मालकांपैकी एक असलेल्या संजय कपूर यांच्या पत्नी नताशा कपूर यांची सुसाइड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येसाठी स्वतःलाच दोषी ठरवले आहे. त्यांनी आपल्या सुसाईडड नोटद्वारे काही रहस्येही मागे सोडली आहेत.
५७ वर्षीय नताशा कपूर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, 'मी स्वत: चा जीव देत आहे. यासाठी कोणीही जबाबदार नाही. मी असे काही केले आहे जे मला करायला नको हवे होते. मी या गोष्टी माझ्या नजरेसमोर उतरले आहे. त्यामुळे नताशा कपूर यांनी असे कोणते काम केले होते, यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली हे रहस्य अद्याप गूढ बनून राहिले आहे.
अॅटलास सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीने केली आत्महत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नताशाचा मोबाईलही ताब्यात घेतला. आत्महत्येपूर्वी नताशाकडे कुणातरी ४ ते ५ एसएमएस पाठवलेहोते. नताशा एसएमएसमध्ये पैशांची मागणी केली होती. नताशा यांनी ज्यांच्याकडे पैसे परत मागितले होते त्यांना पैसे दिले नव्हते ना याचा पोलीस तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस एसएमएस अँगलचीही चौकशी करत आहेत. नताशाचे कुटुंब अद्याप उघडपणे काही सांगण्याची स्थितीत नाही.
नताशा कपूरनेही इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पती आणि कुटुंबावर प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मला संजय कपूर, माझी मुलगी आणि माझा मुलगा आवडतात.” दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेली सुसाइड नोट अर्ध्या पानाची आहे. मंगळवारी नताशा कपूर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. दिल्लीतील औरंगजेब लेन येथील निवासस्थानी पंख्याला त्यांचा मृतदेह लटकलेला आढळला होता.