साडे तीन लाख रूपये देऊन सून आणली, सासू-सासऱ्यांना रूममध्ये बंद करून नणंदेसोबत झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:01 PM2022-06-13T14:01:23+5:302022-06-13T14:03:14+5:30

Rajasthan Crime News : धुमधडाक्यात लग्न पार पडलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती यतु कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. 10 जूनला नवरी पूजा घरात काही न सांगता 13 वर्षीय नणंदेसोबत निघून गेली.

Jharkhand bride escaped with minor sister in law after few days of marriage in pushkar Rajasthan | साडे तीन लाख रूपये देऊन सून आणली, सासू-सासऱ्यांना रूममध्ये बंद करून नणंदेसोबत झाली फरार

साडे तीन लाख रूपये देऊन सून आणली, सासू-सासऱ्यांना रूममध्ये बंद करून नणंदेसोबत झाली फरार

googlenewsNext

Rajasthan Crime News : राजस्थानच्या पुष्करमध्ये लग्नाच्या काही दिवसांनंतर नवीन नवरी अल्पवयीन नणंदेसोबत फरार झाली. असं  सांगितलं जात आहे की,  27 मे रोजी झारखंडच्या जुम्मा रामगढची राहणारी 25 वर्षीय पूजाने पुष्करमधील  28 वर्षीय यतु  श्रीवास्तवसोबत लग्न केलं.

यतुच्या लग्नासाठी कुटुंबिय गेल्या 4 महिन्यांपासून मध्यस्ती पंकज कुमारच्या संपर्कात होते.  पंकज कुमार झारखंडचाच राहणारा आहे. श्रीवास्तव परिवाराने पंकजला लग्नाच्या खर्चासाठी 3 लाख 50 हजार रूपये सुद्धा दिले. 

धुमधडाक्यात लग्न पार पडलं. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती यतु कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. 10 जूनला नवरी पूजा घरात काही न सांगता 13 वर्षीय नणंदेसोबत निघून गेली आणि परत आली नाही. तिने जाताना सासू शशिबाला आणि सासरे दयाप्रकाश यांना रूममध्ये बंद केलं होतं.

सासरे दया प्रकाश यांनी नंतर घर चेक केलं तर नवरीला दिलेलं पाच तोळे सोनं, मोबाइल आणि कॅमेरा गायब होता. त्यांनी तिचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. जेव्हा ती कुठेच दिसली नाही तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

पोलीस अधिकारी अमरचंद यांनी सांगितलं की, नवरी पूजा आणि नणंदेचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहेत. सोबतच पुष्कर बस स्टॅंड आणि अजमेर रेल्वे स्टेशनवर फोटो दाखवून विचारपूस केली जात आहे. दोघी झारखंडला गेल्याचं समजत आहे. 

असं सांगितलं जात आहे की, नवरदेव यतु दिव्यांग आहे. त्याला ऐकू आणि बोलता येत नाही. याच कारणाने श्रीवास्तव परिवार पंकज कुमारच्या संपर्कात आला होता. पंकजनेच त्यांचं लग्न जुळवून दिलं होतं. आता श्रीवास्तव परिवाराने पोलिसांकडे तक्रार दिली असून 13 वर्षीय मुलगी सुखरूप परत यावी ही इच्छा व्यक्त केलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Jharkhand bride escaped with minor sister in law after few days of marriage in pushkar Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.