अज्ञातांकडून जिओची फसवणूक, ग्राहकांची साडेनऊ लाखांची रक्कम हडपली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:53 AM2020-03-16T06:53:26+5:302020-03-16T06:53:39+5:30

जानेवारी महिन्यापासून मोबाइल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने, नोकर भरतीच्या बहाण्याने, फायबर इंटरनेट जोडणीसाठी तसेच इतर व्यवसायांची जाहिरातबाजी या बनावट वेबसाइटवर करण्यात आली होती.

JIO fraud by unknown people | अज्ञातांकडून जिओची फसवणूक, ग्राहकांची साडेनऊ लाखांची रक्कम हडपली

अज्ञातांकडून जिओची फसवणूक, ग्राहकांची साडेनऊ लाखांची रक्कम हडपली

Next

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तींकडून रिलायन्स जिओ कंपनीच्या बनावट २१ वेबसाइट तयार करून त्यावर जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यासाठी संपर्क साधणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी रिलायन्स जिओ कंपनीतर्फे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली .
जानेवारी महिन्यापासून मोबाइल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने, नोकर भरतीच्या बहाण्याने, फायबर इंटरनेट जोडणीसाठी तसेच इतर व्यवसायांची जाहिरातबाजी या बनावट वेबसाइटवर करण्यात आली होती. ते पाहून जे नागरिक संबंधित मोबाइल नंबरवर संपर्क साधत होते, त्यांना रिलायन्स जिओचे कर्मचारी असल्याचे सांगत ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम डिपॉझिट ठेवण्यास सांगितले जात होते. तसेच नफ्याच्या स्वरूपात २५ लाखांचे डिपॉझिट व २५ हजारपर्यंतचे महिना भाडे देण्याचे आमिष दाखवले. पैसे घेतल्यानंतर संबंधितांकडून प्रतिसाद मिळणे बंद झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
यानुसार अनेकांकडून रिलायन्स जिओकडे सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे कंपनीकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी रिलायन्स जिओच्या २१ बनावट वेबसाइट तयार करून, त्यावर फसव्या जाहिराती केल्याचे समोर आले. त्यांनी ९ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
या प्रकरणी कंपनीचे सिक्युरिटी लॉस अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन विभागाचे उपव्यवस्थापक सुधीर नायर यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
 

Web Title: JIO fraud by unknown people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.