शेतकरी आंदोलनासंबंधी वादग्रस्त ट्विटच्या बाबतीत अभिनेत्री कंगना राणौतच्या अडचणी वाढत आहेत. मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला ७ दिवसांचा अल्टीमेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सात दिवसात कंगनाने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असं म्हटलं आहे.
खरं तर, काही दिवसांपूर्वी कंगनाने एक ट्विट रिट्वीट केले होते, ज्यात शेतकरी चळवळीत सामील झालेल्या वृद्ध महिला शेतकर्याला शाहीन बागेचा बिलकीस बानो असं म्हटलं होतं. ट्वीटमध्ये लिहिले होते की, रोजच्या मजुरीनुसार हे काम आजीकडून करून घेतले जाते. कंगनाने वयोवृद्ध महिलेची चेष्टा केली आणि लिहिले, 'हा हा हा ... ही तीच आजी असून तिला भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. ती 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. पाकिस्तानच्या पत्रकारांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पीआरला देखील हायर केले आहे. आम्हाला असे लोक हवे आहेत जे आपल्यासाठी आंतराराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू शकतात. मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर कंगनाला आपले ट्विट डिलीट करावे लागले.
वकील हाकम सिंह म्हणाले की, त्यांनी मोहिंदर कौरचे बिलकिस बानो असा उल्लेख केलेल्या ट्विटवर कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या ट्विटमध्ये अशी चर्चा केली गेली होती की, त्या (मोहिंदर कौर) 100 रुपये घेऊन प्रदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. कंगना राणौत यांनी सात दिवसात माफी मागितली किंवा मानहानीचा खटला दाखल केला जाईल. 'बिलकीस दादी' ही दिल्लीतील शाहीन बागेत सीएएच्या निषेधात सहभागी महिलांपैकी अग्रणी एक महिला होती.