ठाणे : ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.
गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाथ’ बंगल्यावर करमुसे या अभियंत्याला 10 ते 15 जणांनी जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात आधी आव्हाड यांच्या काही कार्यकत्र्याना अटकही झाली होती. त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी यामध्ये आणखी तीन पोलिसांवर अटकेची कारवाई झाली. त्या तिघांचीही जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे शुक्रवारी सोमय्या यांच्यासह ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने केली.
आव्हाड यांच्या निवासस्थानी करमुसे यांना 5 एप्रिल रोजी मारहाण झाली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचा:यांनीच करमुसे यांना घरातून नेले होते. सहा महिन्यांनी या तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अद्यापी, या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही केलेली नाही. या पाश्र्वभूमीवर भाजपाने पोलीस आयुक्तांना हे निवेदन दिले. या प्रकरणात अटक झालेल्या पोलिसांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या? करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित त्यांना कोणी आदेश दिला होता? फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तीन पोलिस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.मंत्री अनिल परब यांनी मध्यमवर्गीयांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या भूखंडावर कब्जा केला आहे. तर सोशल मिडियावर मत व्यक्त करणा:याचे आव्हाड यांनी अपहरण केले. या दोघांवरही कारवाईची भाजपची मागणी असल्याचेही सोमय्या म्हणाले.