Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:50 PM2020-06-04T16:50:30+5:302020-06-04T16:54:16+5:30

गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Kerala Elephant Death: Arrest of accused begins, interrogation of a suspect | Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी 

Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी 

Next
ठळक मुद्देहत्तीणीच्या मृत्यूचे मुख्य कारण अननसात फटाके खायला दिले हे असू शकते. तथापि, अद्याप आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. आता हे कसले स्फोटक आहे, ते अननस, फळांनी किंवा इतर कोणत्याही प्रकारे लपेटले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच आपल्याकडे येईल.

गर्भवती हत्तीणीच्या निर्घृण हत्येचा देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. भुकेनं व्याकूळ असलेल्या हत्तीणीला अननसाच्या आवरणातून फटाके खायला दिली आणि त्यामुळे तिचं तोंड भाजलं... त्यानंतर ती काहीच खाऊ न शकल्यानं तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत असताना अशाच प्रकारे एका हत्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हत्तीणीच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा करण्याची मागणी लोक करत आहेत. दरम्यान, गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

वनविभागाचे प्रधान मुख्य संरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन सुरेंद्र कुमार यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, "हत्तीणीच्या मृत्यूचे मुख्य कारण अननसात फटाके खायला दिले हे असू शकते. तथापि, अद्याप आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणाले की, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात स्फोटात हत्तीणीच्या तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. “आता हे कसले स्फोटक आहे, ते अननस, फळांनी किंवा इतर कोणत्याही प्रकारे लपेटले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच आपल्याकडे येईल.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले की केरळमधील मल्लापुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकारने गांभीर्य दाखवले आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तींना फटाके खाऊन मारणे ही भारतीय संस्कृती नाही. ज्यांनी अननसात स्फोटके ठेवून हत्तीला खाद्य दिले होते, त्यांना पकडण्याचा प्रयत्न तीव्र करण्यात आला आहे.



काय आहे संपूर्ण प्रकरण


केरळमधील मल्लपुरममधून मानवतेला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. येथे, एक गर्भवती महिला अन्नाच्या शोधात जंगलाजवळील गावात आली, पण तेथे नराधमांनी अननसात फटाके भरले आणि हत्तीणीला खायला घातले, ज्याने तिच्या तोंडाला आणि जबड्यांना जबर जखमी केले.

वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्फोटकामुळे त्याचे दातही तुटले होते. यानंतरही मादी हत्तीणीने गावातील कोणाचेही नुकसान केले नाही आणि तिने वेलीयार नदी गाठली, जिथे ती तीन दिवस पाण्यात उभी राहिली. नंतर तिचा आणि तिच्या पोटातील पिल्लाचा मृत्यू झाला.

 

विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली

 

Coronavirus: कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...

 

वडिलांनी मुलीची हत्या करून कब्रस्तानमध्ये मृतदेह पुरला, नंतर बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली 

Web Title: Kerala Elephant Death: Arrest of accused begins, interrogation of a suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.