ज्याने दिली सुपारी, त्याच्याच वडिलांचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:52 PM2019-02-13T12:52:22+5:302019-02-13T12:55:14+5:30
गेल्या ३० वर्षांपासून काम करीत असतानाही आपल्या वडिलांना मालकीण डाफरते, वाईटसाईट बोलते म्हणून तिला धडा शिकविण्यासाठी त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना सुपारी दिली़.
पुणे : गेल्या ३० वर्षांपासून काम करीत असतानाही आपल्या वडिलांना मालकीण डाफरते, वाईटसाईट बोलते म्हणून तिला धडा शिकविण्यासाठी त्याने आपल्या ओळखीच्या लोकांना सुपारी दिली़. मात्र, त्यांनी घरात सांगितल्यानुसार पैसे न आढळल्याने खंडणीसाठी त्याच्याच वडिलांचे अपहरण करुन त्यांना पळवून नेण्यात आले.आपटे रोडवरील बंगल्यात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घरात घुसून पिस्तुल, चाकूचा धाक दाखवून १ कोटी रुपयांची खंडणी मागणाºया मुंबईतील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे़.
किरण किशोर तावडे (वय ३६, रा़ म्हाडा संकुल, शिवडी), दीपक शिवाजी मेदगे (वय ३८, रा़ शिवरंजनी सोसाटी, शिवडी), पारस ठाकूर सोलंगी (वय २८, रा़ खेरवाडी), सचिन स्टॅनी डिसोजा (वय २८, रा़ खेरवाडी), गणेश जर्नाधन गोरे(वय २४, रा़ बांद्रा पूर्व) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. अब्दुल हादी ऊर्फ रिजवान ऊर्फ भाईजान सत्तार शेख (रा़ जनतानगर, चेंबुर) आणि रविकुमार लक्ष्मणप्रसाद सोनी (रा़ सादीप कॉलनी, चेंबुर) हे दोघे फरार आहेत़.
याबाबत प्रभारी अपर पोलीस आयुक्त ज्योतीप्रिया सिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी माहिती दिली़. आपटे रोडवरील सरोज सदन बंगल्यात राहणारे ज्येष्ठ नागरिक हंसराज भवानजी खेमजी (वय ७९) यांचे बंगल्यामध्ये १६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी व्यक्ती घरात शिरले व त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात पाय बांधून हेमा छेडा (वय ६३) व घरातील दोन नोकरांना रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात पाय रस्सीने बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून डांबून ठेवले़. घरातील ५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम जबरी चोरी करुन त्यांनी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती़. चोरट्यांनी आपटे रोडच्या मध्यवर्ती परिसरात या कुटुंबाला तब्बल चार तास डांबून ठेवले होते़. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडवून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता़.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी शहरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती़. त्याचा बारकाईने तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या युनिट १ मधील हवालदार योगेश जगताप व पोलीस नाईक सुधीर माने यांना मुंबई येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळाली़. त्यानुसार तपास पथक तयार करुन मुंबई भागात सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनावरुन पाच जणांना अटक केली आहे़.
या गुन्ह्यात दीपक शिवाजी मेदगे हा मुख्य सुत्रधार असून त्यांच्याकडून मोटार, लुटलेले ४० हजार रुपये, ५० डायमंड खडे व एक लाल रंगाचा खडा, डुप्लिकेट पिस्टल, दोन चाकू असा १० लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे़ .
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांंडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, सहायक फौजदार हनिफ शेख, बाबा चव्हाण, हवालदार अजय थोरात, रिझवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, तुषार खडके, अमोल पवार, वैभव स्वामी, प्रकाश लोखंडे, अशोक माने, सुभाष पिंगळे, धनाजी पाटील, बशीर सय्यद, गजानन सोनुने, संजय बरकडे, अनिल घाडगे, इरफान शेख, उमेश काटे, विजयसिंह वसावे, प्रविण जाधव यांनी केली आहे़.