पिंपरीत दारु प्यायला जाण्यास नकार दिल्याने एकावर चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 02:58 PM2019-03-21T14:58:56+5:302019-03-21T15:05:02+5:30
दारु प्यायला जाण्यास नकार दिल्याने तरुणाला धक्काबुक्की करीत चाकूने वार करण्यात आले...
पिंपरी : दारु प्यायला जाण्यास नकार दिल्याने तरुणाला धक्काबुक्की करीत चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि.२१) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निगडीतील ओटास्किम येथे घडली.
संतोष उर्फ सोन्या चंद्रकांत धरणे (वय २९, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अतुल दिगंबर कसबे (वय २८, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री कसबे हे जेवण करुन शिवाजी चौकात फिरत असताना आरोपी धरणे त्याठिकाणी आला. त्यानंतर धरणे हा कसबे यांना दारु पिण्यासाठी जबरदस्तीने घेवून जाउ लागला. दरम्यान, कसबे यांनी त्यास विरोध केल्याने आरोपीने कसबे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. तसेच खिशातील चाकू काढून त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.