कोल्हापूर : पत्नीचे चारित्र्य आणि आपले अपत्य नसल्याच्या संशयावरुन अतिशय थंड डोक्याने ‘आरव’ या बालकाचा जन्मदात्या बापानेच खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अवघ्या ४८ तासात पोलिसांनी चिमुकल्याचा कर्दनकाळ ठरलेल्या राकेश सर्जेराव केसरे (वय २६, रा. वारणा कापशी) या बापालाच बेड्या ठोकल्या.
वारणा कापशी (ता. शाहुवाडी) येथील दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बेपत्ता झालेल्या आरव केसरे (वय ६) याचा मृतदेह मंगळवारी सापडला.राकेश व साधना यांचा प्रेमविवाह होऊन त्यांना अपत्य झाले. पुढील तीन वर्षात ‘आरव’ हे दुसरे अपत्य झाले. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन ‘आरव’ हे अपत्य आपले नसल्याची भावना राकेशची होती. त्यातून खुनाचा कट रचला. दि. ३ रोजी पती - पत्नीत वाद झाला, पत्नी रागात शेजाऱ्यांकडे गेली. दोघेच घरी असल्याने राकेशने आरवच्या छातीवर कोपराचा जोरदार ठोसा मारुन निपचीत पाडले. घरामागील पडक्या घरात नेऊन त्याचा गळा आवळला. तेथेच कोबडे कापण्यासाठी खोदलेल्या चरात ‘आरव’चा मृतदेह कडब्याच्या पेंड्यांखाली लपवला व बेपत्ताचा कांगावा केला, दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेह काढून घराबाहेर टाकला.गुन्ह्याचा घटनाक्रम...०३ ऑक्टोबरदुपारी ४.०० वा. : चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीत वाद.सायं ४.३० वा. : राकेशने आरवला मारुन पडक्या घरात लपवले.साय. ५.३० वा. : राकेश हाॅटेल मालकासह कामासाठी गेला.साय. ७ वा. : घरी फोन करुन पत्नीच्या प्रकृतीची दोनवेळा चौकशी.रात्री ८ वा. : ‘आरव’ बेपत्ताची बांबवडे पोलिसात तक्रार०४ ऑक्टोबर : बापू गायकवाड याच्या दुकानातून राकेशने नारळ, लिंबू, गुलाल, हळद, कुंकू खरेदी केले.रात्री १०.३० वा. : पडक्या घरातून मृतदेह बाहेर टाकला. गुलाल, हळद, कुंकू टाकून नरबळीची दिशाभूल.०५ ऑक्टोबर :पहाटे ५.३० वा. : शेजाऱ्यांच्या दारात ‘आरव’चा मृतदेह आढळला. पोलीस तैनात०६ ऑक्टोबर : दिवसभरात अनेकांकडे चौकशीसायं. ६ वा. : राकेश केसरे ताब्यात.रात्री ८ वा. खुनाची कबुली.कौशल्यपूर्ण तपासाचे शिलेदार, २५ हजारांचे बक्षीसपोलिसांनी कौशल्याने खून उघड केला. सायबर क्राईमचे पो. नि. शशिराज पाटोळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा. पो. नि. किरण भोसले, पोलीस हिंदुराव केसरे, महिला दक्षताच्या सहा. पो. नि. श्रध्दा आंबले हे तपासाचे शिलेदार ठरले. त्यांना पोलीस उपअधीक्षक रवींद्र साळोखे, पो. नि. विजय पाटील यांचे सहकार्य लाभले. पोलीस केसरे हे संशयिताचे भाऊबंद असून, त्याच गावात राहतात. त्यांची गुन्हा उकल होण्यास मोलाची मदत लाभली. तपास पथकाला अधीक्षक बलकवडे यांनी २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले.सासू देवताळीसंशयिताची सासू देवताळी असल्याने संशयित केसरे याने मृतदेहावर गुलाल, हळद, कुंकू टाकून सासू व पत्नी यांनीच हा नरबळी दिल्याचा खोट्या दिखाव्याचा परिस्थितीजन्य पुरावा उभा केला होता.चुलत्याचा लळामृत मुलाला चुलता संतोष केसरे याचा लळा होता, तो अविवाहीत असून, भावाने त्याला मारल्याचे समजल्यावर तो त्याच्या अंगावर धावून गेला, मला मारलं पाहिजे होतस, त्या पोराला का मारलसं? असे म्हणून त्याने टाहो फोडला.