सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:55 PM2022-06-07T13:55:09+5:302022-06-07T13:56:09+5:30

Salman Khan : दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही.

Lawrence Bishnoi's hand in threatening Salman Khan? The gangster said in front of the Delhi Police ... | सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

Next

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राच्या प्रकरणात संशयाची सुई गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडे वळली  आहे. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रासंदर्भात दिल्लीपोलिसांनी तपासाचा फास आवळला असून सोमवारी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली. दिल्ली पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कोणी लिहिले हे देखील मला माहीत नाही.

खरं तर, मुंबई पोलिसांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांचा जबाब नोंदवला. त्यांना एक दिवस आधी पत्र मिळाले होते. त्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच पिता-पुत्र दोघांनाही सामोरे जावे लागेल असं नमूद होतं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सलमान खानच्या वांद्रे येथील घराला भेट दिल्यानंतर आणि घराभोवती सुरक्षा वाढवल्यानंतर, सलमान घरी नसल्याने पोलीस अभिनेत्याचा जबाब नोंदवू शकले नाहीत.

पोलीस सूत्राने सांगितले की, धमकीच्या पत्रात 'सलीम खान, सलमान खान लवकरच तुझे नशीब मूसवालासारखे होईल, जी.बी. एल.बी' असे लिहिले आहे.  जी.बी. एल.बी म्हणजेच  कुख्यात आरोपी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांचा नावाचं आद्याक्षर आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गेल्या महिन्यात पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.


स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोईचा या टोळीचा हत्याकांडात सहभाग असू शकतो, परंतु आता त्याने स्वत:चा कोणताही सहभाग असल्याबाबत नकार दिला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले की, बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला मिळालेले धमकीचे पत्र आम्ही गांभीर्याने घेतले आहे. “हे पत्र बनावट आहे की नाही हे सांगणे खूप घाईचे होईल आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी यात सामील आहे याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सलीम खान आणि त्यांच्या दोन अंगरक्षकांचे जबाब नोंदवले, परंतु सलमान खान उपलब्ध नसल्याने त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. पुढे ते म्हणाले की, सलीम खान मॉर्निंग वॉकनंतर ज्या बाकावर सलीम खान बसले होते त्या बाकावर रविवारी धमकीचे पत्र सापडले. पत्र कोणी ठेवले त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केले आहेत.


अधिकाऱ्याने सांगितले की, बेंचपासून ३० मीटर अंतरावर एक सीसीटीव्ही कॅमेरा होता, पण एक झाड दृश्यात अडथळा आणत आहे. सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचच्या पाच अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांसह सलमान खानच्या वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंट्स येथील निवासस्थानी जाऊन त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. ते सुमारे एक तास अभिनेत्याच्या घरी थांबले आणि नंतर निघून गेले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 506-II (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Lawrence Bishnoi's hand in threatening Salman Khan? The gangster said in front of the Delhi Police ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.