चेन्नई - चेन्नईआंतरराष्ट्रीयविमानतळावर 3 जणांकडून 1.32 कोटी रुपयांचे 2.88 किलो सोनं जप्त करण्यात आले. सोन्याची खासगी भागातून तस्करी होत होती. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी मंगलोर आंतरराष्ट्रीयविमानतळावरीलअधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुबईहून येत असलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे 25.45 लाख किंमतीचे 500 ग्रॅम सोने जप्त केले. अटक झाल्यानंतर प्रवाशाला न्यायालयात हजर केले होते. इलेक्ट्रिक राईस कुकर हीटिंग एलिमेंटमध्ये सोने लपलेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अशाच एका घटनेत केरळमधील कन्नूर विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिट म्हणजेच हवाई गुप्तचर विभागाने (एयूआय) दुबईच्या एका प्रवाशाकडून 31.21 लाखांचे सोने जप्त केले. शनिवारी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून चेन्नई एअर कस्टमने चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 139 ग्रॅम सोन्याची पेस्ट जप्त केली. १० ऑक्टोबर रोजी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरतीन जणांकडून १.३२ कोटी रुपयांचे २.८८ किलो सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींनी चक्क गुदाशयात पेस्ट स्वरूपात सोन्याची तस्करी केली होती, अशी माहिती चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळचे कस्टम आयुक्त यांनी दिली.