खाकीमधले साहित्यिक ; राज्य पोलीस साहित्य संमेलन संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 08:29 PM2019-02-25T20:29:06+5:302019-02-25T20:31:40+5:30
या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी सुद्धा पोलिसांचे कौतुक केले.
मुंबई - देशातल्या पहिल्या पोलीस साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी सुद्धा पोलिसांचे कौतुक केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हे साहित्यसंमेलन पार पडले.
आपल्या भाषणात बोलताना अशोक बागवे म्हणाले की, महाराष्ट्रपोलिसांच हे संमेलन देशात आपल्या खाकी कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे आहे. मात्र, यंदा पोलीस विभागातील कर्मचारी ते वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसाठी देशातील पहिले महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या पोलीस विभागाच्या या पहिल्या वहिल्या साहित्य संमेलनाला दक्ष म्हणून नाव देण्यात आले होते. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसागलीकर यांच्याकडून या पोलीस साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील 171 अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, जेष्ठ साहित्यीक अशोक बागवे यांच्यासह जेष्ठ साहित्यिक व हास्य कवी अशोक नायगावकर सुद्धा उपस्थित होते. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कविता, चारोळ्या, साहित्य चर्चा सह-मतमतांतरे पोलीस खात्यातील साहित्यिकांकडून ऐकायला आणि अनुभवायला मिळाली.
महाराष्ट्र पोलिसांचं सर्वानाच लहापणापासून भीती असते पण त्यांच्यातला दर्दी माणूस आज या साहित्य संमेलनानिमित्त दिसून आला. पोलिसांमध्ये इतके साहित्यिक आहेत की त्यांच्यामुळेच आमचा साहित्याला कोणी हात लावू शकत नाहीत.हे पहिलं संमेलन आहे. त्याच नंदवन होईल काही काळाने खात्रीशीर सांगतो. आंधळ्या डोळसला मार्ग दाखवतो तो खरा साहित्यिक आहे आणि पोलिसांनी अनेकांना मार्ग दाखवला आहे. साहित्य संमेलनाला शिस्त असावी लागते आणि तीच शिस्त मला पहिल्यांदाच अनेक संमेलनांमधून पहिल्यांदा या संमेलनात दिसली असे म्हणत दत्ता पडसलगीकर यांनी देखील या सोहळ्याचे कौतुक केले.