लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केली दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 09:13 PM2020-04-22T21:13:03+5:302020-04-22T21:15:25+5:30
यावेळी दगडफेक झाल्याने पोलिस पथकाचा एक जवान जखमी झाला.
लॉकडाऊन काळात देशभरात अनेक ठिकाणी आपल्यासाठी कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्यावर ठिकठिकाणी हल्ले केले जात आहेत. ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यातच राजधानी लखनौच्या कॅंट पोलिस स्टेशन परिसरातील भागात पोलीस पथकावर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी दगडफेक केली. हे लोक लॉकडाऊनमध्ये आपली घरे सोडून रेल्वेमार्ग ओलांडून इतर भागात जात होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. यावेळी दगडफेक झाल्याने पोलिस पथकाचा एक जवान जखमी झाला.
पोलिसांवर दगडफेक करून हल्लेखोर फरार झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, पोलीस उपायुक्त सोमेन वर्मा यांनी दगडफेक नाकारली. ते म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंगजवळ काही मुलांना पोलिसांनी अडकाव केले असता पोलीस आणि त्या मुलांमध्ये भांडण सुरु झाले होते.