उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत लव्ह जिहादची (Love Jihad) घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'एका व्यक्तीने आपल्या एकुलत्या एक मुलीला षड्यंत्र करून फसवले आणि तिच्याशी विवाह केला,' असा खळबळजनक आरोप दिल्लीतील IAS अधिकारी के. सारंगी (IAS K. Sarangi) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी गाझियाबाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (IAS Officer Daughter Love Jihad)
MBBS आहे मुलगी - IAS अधिकारी सारंगी यांनी म्हटल्यानुसार, त्यांची एकुलती एक मुलगी डॉ. हर्ष भारती सारंगी 2016 मध्ये युक्रेनमधून एमबीबीएसचे शिक्षण घेऊन परतली होती. तेव्हापासून मेरठमधील मवाना येथे राहणारा अब्दुल रहमान हा आपल्या मुलीमागे पडला होता. त्याने कट रचून आपल्या मुलीची फसवणूक केली. त्याचा उद्देश मुलीचे धर्मांतर करणे आहे. महत्वाचे म्हणजे, लग्न लावून देणाऱ्या दोन संस्थांचाही या कटात सहभाग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
'उकळत्या तेलाने चेहरा जाळण्याचा प्रयत्न' -सारंगी यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे, की संबंधित व्यक्तीने कट रचून आपल्या मुलीला फसवले. त्याने सर्वप्रथम आपल्या मुलिला सहानुभूती दाखवली. यानंतर तो दबाव टाकून तिला आपल्यासोबत ठेवू लागला. या संपूर्ण घटनेत मौलाना लोकांनीही त्याला मदत केली. एवढेच नाही, तर त्याने उकळत्या तेलाने मुलीचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्नही केला होता. जेणेकरून तिच्याकडे अब्दुल सोबत लग्न करण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही, असा धक्कादायक आरोपही सारंगी यांनी केला आहे.
कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी मंदिरात रजिस्ट्रेशन -सारंगी म्हणाले, आरोपी अब्दुलने कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी नोव्हेंबर 2018 मध्ये मंदिरात आपल्या मुलीसोबत लग्न केले आणि सध्या दोघेही नोएडा येथे राहत असल्याचे सांगितले. सारंगी यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अब्दुल रहमान, वैदिक हिंदू सभा, गाझियाबादमधील पदाधिकारी, आर्य समाज मंदिर ट्रस्ट आणि दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
यासंदर्भात, पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू करत दोन्ही ठिकाणच्या पदाअधिकाऱ्यांकडून उत्तर मागवण्यात आले आहे. गाझियाबादचे पोलीस कॅप्टन मुनीराज यांनी सांगितल्यानुसार, आयपीसीच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलाने आपल्या मुलीसोबत, फसवणूक करून लग्न केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून मुलगी आणि मुलांच्या चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.