आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:43 PM2021-06-23T16:43:45+5:302021-06-23T16:45:24+5:30
रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये दोन्ही आरोपींनी भारतीच्या नावावर २.५ लाख रूपयांची एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. आणि त्याच पैशांसाठी तिची हत्या करण्यात आली.
लुधियानाच्या हंबडा शहरातून आईच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अशी घटना ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. इथे एका स्वार्थी आईने आपल्या दुसऱ्या पतीसोबत मिळून आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या मुलीची हत्या केली गेली तिचं नाव भारती आहे. या आईने आपल्या ९ वर्षीय मुलीची हत्या इन्शुरन्सच्या पैशांसाठी केली. ती २७ वर्षीय आई पिंकी आणि ३१ वर्षीय सावत्र वडील नरिंदरपालसोबत राहत होती.
पिंकी तिच्या पहिल्या पतीपासन वेगळी झाली होती आणि नरिंदरपालसोबत राहू लागली होती. काही दिवसांनी दोघांनी लग्नही केलं. तेव्हा पिंकीची मुलगी भारतीचं वय ३ वर्षे होतं. १९ जूनला हंबडा गावातील एका फॅक्टरीमध्ये नेऊन दोघांनी मुलीचा गळा दाबला आणि यामुळे मुलीचा मृत्यू झाला.
रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये दोन्ही आरोपींनी भारतीच्या नावावर २.५ लाख रूपयांची एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. आणि त्याच पैशांसाठी तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी २०१९ मध्ये एक प्लॉट खरेदी केला होता आणि त्यासाठी इन्स्टॉलमेंटमद्ये पैसे भरत होते. त्यांनी १.४९ लाख रूपये बॅंकेला दिलेही होते. पण शिल्लक राहिलेल्या पैशांची सोय होत नव्हती. यानंतर दोघांनी हा प्लॅन केला. त्यांनी विचार केला की, मुलीची हत्या करून इन्सुरन्सचे पैसे घेतील आणि बॅंकेचं कर्ज फेडतील. नरिंदर कुमार आणि पिंकी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (हे पण वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार)
पोलिसांनुसार मुलीला ते ओझं समजत होतं. त्यामुळे तिला त्यांना काहीही करून रस्त्यातून हटवायचं होतं. आरोपींनी आधी तिचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिला हार्ट अटॅक आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी मुलीचं पोस्टमार्टम केलं तेव्हा मृत्यूचं खरं कारण समोर आलं. ज्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, पिंकी आणि नरिंदर यांना एक मुलगाही आहे. ज्याचं वय सहा वर्षे आहे.