'जब से हुई हैं शादी आंसू बहा रहां हूं' गाणं गात पतीने पोलिसांकडे केली पत्नीची तक्रार, वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:25 PM2022-01-06T16:25:28+5:302022-01-06T16:26:02+5:30

Madhya Pradesh: पीडित धर्मेंद्र पॉलने पोलिसांना सांगितलं की, तो त्याच्या पूर्ण परिवार आणि मुलांसोबत आनंदी आहे. पण त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार केला जात आहे.

Man cry and sung a song while Wife torturing police complaint in Gwalior Madhya Pradesh | 'जब से हुई हैं शादी आंसू बहा रहां हूं' गाणं गात पतीने पोलिसांकडे केली पत्नीची तक्रार, वाचा काय आहे भानगड

'जब से हुई हैं शादी आंसू बहा रहां हूं' गाणं गात पतीने पोलिसांकडे केली पत्नीची तक्रार, वाचा काय आहे भानगड

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्लाव्हेरमध्ये (Gwalior) एक व्यक्ती आपल्या पत्नीला इतका वैतागला की, त्याला मदत मागण्यासाठी पोलिसांकडे जावं लागलं. सोबतच हा पीडित व्यक्ती  पोलिसांसमोर एक गाणंही गाऊ लागला होता. एसएसपी अमित सांघी यांनी सांगितलं की, पीडित तरूण मानसिक रूपाने फारच त्रासलेला आहे. आम्ही त्याची शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करू.

पत्नीची तक्रार घेऊन पोलिसांकडे

पीडित धर्मेंद्र पॉलने पोलिसांना सांगितलं की, तो त्याच्या पूर्ण परिवार आणि मुलांसोबत आनंदी आहे. पण त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार केला जात आहे. त्याची पत्नी आणि सासरचे लोक त्याला फार त्रास देत आहेत. पत्नी मला बरोबर जेवायला देत नाही आणि शिव्या देते. यानंतर पीडित तरूणाने पोलिसांसमोर एक गाणं गायलं, 'जब से हुई है शादी आंसू बहा रहां हूं, आफत गले पडी हैं उसे निभा रहां हूं'.

धर्मेंद्रने सांगितलं की, १९९८ मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या जागेवर त्याला अनुकंपात सरकारी आरोग्य खात्यात नोकरी लागली. २०१६ मध्ये त्याने अनितासोबत लग्न केलं. काही दिवसांनंतर पत्नी आणि तिच्या घरचे लोक त्रास देऊ लागले. सर्वात मोठी अडचण ही आहे की, तिच्या विधवा आईला कोणतंही पेंशन नाही. मी दर महिन्याला त्यांना चार हजार रूपये देतो. कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते. लग्नाआधी तिच्या आईकडे पूर्ण अथॉरिटी होती. 

पत्नीने त्याच्या जीपीएफचा पूर्ण पैसा काढून आपल्या पर्सनल अकाऊंटमध्ये टाकला. माझ्या भाचीचं लग्न आहे आणि आता ती मला पैसे देण्यास नकार देत आहे. मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली नाही. २०२० मध्ये असं ठरलं की, मी पत्नीला दर महिन्याला १० हजार रूपये देणार. मला माझ्या पत्नी आणि मुलांसोबत रहायचं आहे. मला माझं जॉइंट अकाऊंट सिंगल हवं आहे. मला माझे ९० हजार रूपये परत हवे आहेत.

याप्रकरणी पोलीस अधिक्षक अमित सांघीने सांगितलं की, बरेच लोक आले होते. त्या गर्दीत एक तरूण बसला होता. जशी त्याने बोलायला सुरूवात केली मी फक्त त्याला ऐकतच राहिलो. त्यानंतर मी त्याच्या समस्येची चौकशी करण्यास सांगितलं. तो मानसिक रूपाने त्रासलेला होता. त्याची शक्य ती मदत केली जाईल.
 

Web Title: Man cry and sung a song while Wife torturing police complaint in Gwalior Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.