केंदूझार: केवळ पाच रुपयांवरून झालेल्या वादाचं रुपांतर मारहाणीत झाल्याचा प्रकार ओदिशातल्या केंदूझारमध्ये घडला आहे. ग्राहकानं पाच रुपये कमी दिल्यानं हॉटेल मालक संतापला. त्यानं ग्राहकाला जबर मारहाण केली. त्यामुळे ग्राहक रक्तबंबाळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केंदूझारमधल्या पोदाखमाना गावात राहणारे जितेंद्र देहुरी हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवणानंतर त्यांनी बिलाची विचारणा केली. जेवणाचं बिल ४५ रुपये झालं होतं. मात्र जितेंद्र यांच्याकडे ४० रुपयेच होते. त्यानं ही बाब हॉटेल मालकाला सांगितली. ५ रुपये नंतर देतो, असं जितेंद्र म्हणाले. त्यावरून हॉटेल मालक संतापला. त्यांना जितेंद्र यांना मारहाण केली. जितेंद्र चहाचं दुकान चालवतात.जादू दाखवतो म्हणत तरुणाला संध्याकाळी जमिनीत गाडलं; सकाळी पुन्हा खड्डा खणला तेव्हा...
जितेंद्र देहुरी शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास माँ हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवणानंतर त्यांनी काऊंटरवर बिल विचारलं. हॉटेल मालक मधू साहू यांनी ४५ रुपये देण्यास सांगितले. आधीची १०० रुपये उधारी देण्यासही मालकानं सांगितलं. त्यावेळी जितेंद्र यांच्याकडे ४० रुपयेच होते. भात, वरण आणि थोड्याशा भाजीचे ४५ रुपये कसे काय असा सवाल जितेंद्र यांनी विचारला. आता माझ्याकडे ४० रुपयेच आहेत. ५ रुपये नंतर उधारीच्या रकमेसोबत देतो, असं त्यांनी मधू साहू यांना सांगितलं.
अवघ्या ५ रुपयांवरून जितेंद्र आणि हॉटेल मालकात वाद झाला. मालक आणि त्याच्या मुलानं जितेंद्रला जबर मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती केंदूझारचे पोलीस अधीक्षक मित्रभानू महापात्र यांनी दिली.